Maharashtra Election 2019 ; आठ मतदारसंघांत १७२ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:00 AM2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:44+5:30

नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (तिवसा), बच्चू कडू (अचलपूर) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

Maharashtra Election 2019 ; 172 candidates in eight constituencies | Maharashtra Election 2019 ; आठ मतदारसंघांत १७२ उमेदवार

Maharashtra Election 2019 ; आठ मतदारसंघांत १७२ उमेदवार

googlenewsNext
ठळक मुद्देएकूण २२९ अर्ज दाखल : बडनेरा, अमरावतीत सर्वाधिक २८; मेळघाटात सर्वात कमी १३ उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणूक नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत १७२ उमेदवारांनी २२९ अर्ज दाखल केले. अमरावती आणि बडनेऱ्यातून सर्वाधिक २८, तर मेळघाटातून सर्वात कमी १३ उमेदवार तूर्तास रिंगणात आहेत.
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (तिवसा), बच्चू कडू (अचलपूर) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अवधी आहे. त्यामुळे १७२ पैकी किती उमेदवार रिंगणात कायम राहतात, हे चित्र त्याच दिवशी सायंकाळी स्पष्ट होईल, असे निवडणूक विभागाने सांगितले.
प्रचाराची रणधुमाळी ८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील. त्यामुळे उमेदवारांना खºया अर्थाने मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह, नाव, पक्ष पोहोचविण्यासाठी केवळ ११ दिवस मिळणार आहेत. आठही मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षासह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. तथापि, ७ ऑक्टोबर रोजी राजकीय मैदानात कोणता पहिलवान कायम राहील, यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात वीरेंद्र जगताप, प्रताप अडसड, प्रवीण घुईखेडकर, नीलेश विश्वकर्मा, सविता कटकतलवारे, अभिजित ढेपे यांच्यासह एकूण २४ उमेदवार आहेत. बडनेरा मतदारसंघात रवि राणा, प्रीती बंड, प्रमोद इंगळे, नीलेश थेटे, राजू जामनेकर, पुरुषोत्तम भटकर, सिद्धार्थ गोंडाणे, शैलेश गवई यांच्यासह एकूण २८ उमेदवार आहेत.
अमरावती मतदारसंघात सुनील देशमुख, सुलभा खोडके, मो. अलिम पटेल यांच्यासह २८ उमेदवार आहे. तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर, राजेश वानखडे, दीपक सरदार, अब्दूल नईम यांच्यासह एकूण २१ उमेदवार आहे. दर्यापूर मतदारसंघात रमेश बुंदिले, बळवंत वानखडे, रेखा वाकपांजर, सीमा सावळे, गौतम इंगळे, सागर कलाने, चंद्रकांत बोदडे, मीनाक्षी करवाडे यांच्यासह २५ उमेदवार आहेत.
मेळघाट मतदारसंघात रमेश मावस्कर, राजकुमार पटेल, केवलराम काळे, लक्ष्मण धांडे, रामकिशोर जांबू, शैलेश गावंडे यांच्यासह एकूण १३ उमेदवार आहेत. अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू, बबलू देशमुख, सुनीता फिस्के, राजेंद्र गवई यांच्यासह एकूण १५ उमेदवार आहेत. मोर्शी मतदारसंघात अनिल बोंडे, वसुधा बोंडे, राजेंद्र भाजीखाये, सैयद फारूख, देवेंद्र भुयार, नंदकिशोर कुयटे यांच्यासह एकूण १८ उमेदवार आहेत.

श्रीराम नेहर यांचे ‘इंजिन’ हुकले
दर्यापूर : शपथपत्र दाखल करून अनामत रक्कम व उमेदवारी अर्ज वेळेत सादर करण्यात न आल्याने मनसेचे श्रीराम नेहर यांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागले. त्यांनी न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या उमेदवारी न मिळाल्याने श्रीराम नेहर यांनी मनसेकडे धाव घेतली. त्यांना शुक्रवारी मनसेचा ए, बी फॉर्म देण्यात आला. त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, उमेदवारी अर्जासोबत आवश्यक अनामत रक्कम व नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला नाही. दुपारी ३ नंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांना विनंती केली. परंतु, आता त्यांना नामनिर्देशनपत्र सादर करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 172 candidates in eight constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.