Maharashtra Election 2019 ; रक्तदान करून दाखल केली बच्चू कडूंनी उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:00 AM2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:50+5:30

रक्तदान केल्यानंतर आमदार बच्चू कडू, त्यांच्या सहधर्मचारिणी नयना कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने अचलपूर एसडीओ कार्यालयाबाहेर आपआपल्या वाहनांनी दाखल झालेत. कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रहारची टोपी आणि प्रहारचा दुपट्टाही होता.

Maharashtra Election 2019 ; Baby Bitter candidates filed for blood donation | Maharashtra Election 2019 ; रक्तदान करून दाखल केली बच्चू कडूंनी उमेदवारी

Maharashtra Election 2019 ; रक्तदान करून दाखल केली बच्चू कडूंनी उमेदवारी

Next
ठळक मुद्दे३५० प्रहारींचे रक्तदान : आईचा घेतला आशीर्वाद; शक्तिप्रदर्शनास फाटा

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : आईचा आशीर्वाद घेऊन रक्तदानानंतर आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गुलाबबाबा पॅलेसमध्ये रक्तदान आयोजित करण्यात आले होते. यात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. रक्तदानाकरिता ७०० ते ८०० कार्यकर्ते तयार होते. यातील ३५० कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
रक्तदान केल्यानंतर आमदार बच्चू कडू, त्यांच्या सहधर्मचारिणी नयना कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने अचलपूर एसडीओ कार्यालयाबाहेर आपआपल्या वाहनांनी दाखल झालेत. कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रहारची टोपी आणि प्रहारचा दुपट्टाही होता. आमदार बच्चू कडू, नयना कडू, डॉ. सुरेंद्र बरडियांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासमक्ष हजर झालेत. तेथे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. प्रहारचे बल्लू जवंजाळ, प्रवीण पाटील, संजय तट्टे, बंटी ककरानिया, बंटी उपाध्याय, सतीश व्यास, महेंद्र अग्रवाल, संतोष नरेडी, बाळासाहेब खडसे, अंकुश जवंजाळ, मनोज नंदवंशी, संतोष नरेडी, सुनील अग्रवाल यांच्यासह अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील शेकडो लोक एसडीओ कार्यालयाबाहेर निर्धारित सीमेवर उभे होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस व आमदार बच्चू कडू उमेदवारी अर्ज दाखल करणार म्हणून एसडीओ कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.
शहरातील परिस्थिती बघता आमदार बच्चू कडू यांनी शक्तिप्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवार, ३ आॅक्टोबरलाही आमदार बच्चू कडू यांच्यावतीने भास्कर मासोदकर यांनी बच्चू कडूंचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केला होता.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Baby Bitter candidates filed for blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.