Maharashtra Election 2019 ; सदर बाजारात बच्चू कडू यांचे दमदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:47+5:30
बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी लढविलेल्या आणि जिंकलेल्या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह 'कपबशी' होते. मात्र, तिसरी निवडणूक त्यांनी 'नारळ' या चिन्हावर लढवली. यावेळीही त्यांनी विजय मिळविला. यावेळी त्यांना ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच बच्चू कडू यांचे शहरातील सदर बाजार परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले होते. यावेळी सदर बाजारवासीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
बच्चू कडू यांनी बुधवारी सदर बाजारात घरोघरी जाऊन संवाद साधला. व्यापारी प्रतिष्ठानांना भेटी दिल्या. यावेळी बच्चू कडू व उपस्थितांमध्ये अनौपचारिक ओळखीतून प्रचारातील अनेक मुद्द्यांवर खुली चर्चाही झाली. यावेळी प्रवीण पाटील, बाळासाहेब खडसे, सतीश व्यास, श्याम मालू, संतोष नरेडी, सुनील अग्रवाल, मनोज नंदवंशी, अग्रवाल गोंदवाले, महेंद्र अग्रवाल, डॉ. बरडिया, बन्सल, बंटी उपाध्याय, राजेंद्र चांडक यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
बॅलेटवर फक्त बच्चू !
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर बच्चू कडू च्या अर्जावर ‘ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू’ असे नाव लिहिण्यात आले. यादरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संवाद साधत बच्चू कडू यांनी बॅलेट युनिटवर केवळ ‘बच्चू बाबाराव कडू’ असे अंकित करण्यास सूचविले. यामुळे आता ‘ओमप्रकाश ऊर्फ’ न राहता केवळ ‘बच्चू’ बाबाराव कडू असे नाव राहणार आहे.
पुन्हा ‘कपबशी’
बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी लढविलेल्या आणि जिंकलेल्या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह 'कपबशी' होते. मात्र, तिसरी निवडणूक त्यांनी 'नारळ' या चिन्हावर लढवली. यावेळीही त्यांनी विजय मिळविला. यावेळी त्यांना ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
मतदारसंघात पहिल्यांदाच हॅट्ट्रिक
अचलपूर विधानसभा मतदारसंघात आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण करीत तिसऱ्यांदा विधानसभेवर जाणारे बच्चू कडू एकमेव आमदार ठरले आहेत. आता चौथ्यांदा त्यांच्याच विजयाचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला. मतदारांच्या भावनांचा आदर राखून त्यांच्यातीलच एक होण्याची ग्वाही बच्चू कडूंनी याप्रसंगी दिली.