Maharashtra Election 2019 ; अल्प कालावधी असल्याने उमेदवारांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:45+5:30

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्या हातात जेमतेम बारा दिवस राहिले आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता, मतदारांना उमेदवार कधी भेटणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे, मेळघाट मतदारसंघ डोंगरी, दुर्गम आहे.

Maharashtra Election 2019 ; Candidates hesitate because of short duration | Maharashtra Election 2019 ; अल्प कालावधी असल्याने उमेदवारांची दमछाक

Maharashtra Election 2019 ; अल्प कालावधी असल्याने उमेदवारांची दमछाक

Next
ठळक मुद्देमतदारसंघात प्रचारादरम्यान लागणार कस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. विविध मतदारसंघांचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास, मेळघाट मतदारसंघ हा डोंगरी दुर्गम भागाचा असून, विविध भागांत पसरला आहे. उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. याशिवाय कमी कालावधीमुळे गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांची पंचाईत होऊन बसली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्या हातात जेमतेम बारा दिवस राहिले आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता, मतदारांना उमेदवार कधी भेटणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे, मेळघाट मतदारसंघ डोंगरी, दुर्गम आहे. काही भागात रस्त्यांची दुरवस्था उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरू शकते. निवडणूक प्रचाराचे वारे वाहू लागले की, अनेक कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येते. सकाळी लवकर उठून कार्यकर्ते पक्ष कार्यालय गाठतात आणि गावोगावी भेटी देतात. दुपारी, संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारतात. परंतु, प्रचारासाठी दिवस थोडे असल्याने जोपर्यंत मतमोजणी होत नाही, तोपर्यंत आपण प्रचारात आहोत, असे सांगितले जात आहे. ७ आॅक्टोबरनंतर प्रचाराच्या कामाला वेग येणार आहे.

प्रचाराचा आवाज घूम लागला
विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष व अन्य उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी ७ आॅक्टोबरची मुदत असली तरी जे उमेदवार माघार घेणार नाहीत, अशा काही उमेदवारांनी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला आहे. लाऊडस्पीकवर संगीताच्या माध्यमातून मतदारांना ते मतांचा जोगवा मागत असल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Candidates hesitate because of short duration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.