Maharashtra Election 2019 : धामणगाव मतदारसंघात १८० समाजमंदिरांची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:41+5:30
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात १८० समाजमंदिरांची उभारणी करण्यात आल्याची माहिती आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. मतदारसंघात नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या तीन तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. तसेच दोन नगरपालिका व एक नगरपंचायत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात १८० समाजमंदिरांची उभारणी करण्यात आल्याची माहिती आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. मतदारसंघात नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या तीन तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. तसेच दोन नगरपालिका व एक नगरपंचायत आहे. त्या सर्व गावांशी असलेली सामाजिक बांधिलकी अधिक वृद्धिंगत करण्यासाठी समाजमंदिरांची उभारणी केल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.
वीरेंद्र जगताप यांनी आपल्या आमदारकीच्या १५ वर्षांच्या काळात प्रत्येक समाजाच्या श्रद्धास्थानांचा विकास केला. अनेक गावांमध्ये बौद्ध समाजातील नागरिकांना बसायला जागा नाही, प्रार्थनामंदिर नसल्याची बाब आ. जगताप यांनी निरीक्षणाअंती नोंदविली. भात्रतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक म्हणून ती बाब आपल्याला खटकली. त्यातून बौद्ध बांधवांसाठी समाजमंदिर व प्रार्थना स्थळांची उभारणी करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. त्यातून तीनही तालुक्यांतील गावांमध्ये तब्बल १८० समाजमंदिरे उभारले गेलेत. काही गावांमध्ये त्यांचे सौंदर्यीकरण व बांधकाम सुरू असल्याची माहिती आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली.
मतदारसंघात सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी आपण सदैव आग्रही आहोत. त्याच पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष भूमिकेतून ही १८० समाजमंदिर साकारल्याची माहिती आ. वीरेंद्र जगताप यांनी दिली.