Maharashtra Election 2019 ; आज मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:32 AM2019-10-24T01:32:18+5:302019-10-24T01:35:16+5:30

मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५, मेळघाट २६, अचलपूर २२ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या होणार आहेत.

Maharashtra Election 2019 ; Counting today | Maharashtra Election 2019 ; आज मतमोजणी

Maharashtra Election 2019 ; आज मतमोजणी

googlenewsNext
ठळक मुद्देअशी आहे मतमोजणीची प्रक्रिया

सकाळी ५ वाजता मतमोजणी कर्मचाऱ्यांचे रॅन्डमायझेशन, ६ वाजता मतमोजणी प्रतिनिधींपुढे स्ट्राँग रूम उघडणे, सकाळी ७ वाजता टपाली व ईटीपीबीएस मतपत्रिका आणणे, ८ वाजता टपाली मतांची मोजणी, नंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रांमधील मतांची प्रत्येकी १४ टेबलवर मोजणी करण्यात येईल. सर्वात शेवटी मतदान केंद्राच्या चिठ्ठ्यांमधून पाच चिठ्ठ्या काढण्यात येऊन त्या पाच मतदान केंद्रांच्या ईव्हीएममधील मतांशी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची पडताळणी करण्यात आल्यानंतर आयोगाच्या परवानगीने निवडणूक निर्णय अधिकारी निकालाची घोषणा करतील.

मतमोजणी फेऱ्यांचे सूत्र
मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५, मेळघाट २६, अचलपूर २२ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या होणार आहेत.

जिल्हा ग्रामीणचा असा राहणार बंदोबस्त
मतमोजणीसाठी सात डीवायएसपी, १६ पीआय, ६२ एपीआय, पीएसआय, ८७२ पोलीस कर्मचारी, ९४ वाहतूक शिपाई, २९ व्हीडीओ पथक व ७०० होमगार्ड राहणार आहे. स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय बंदोबस्त आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी ७५ जवानांचा खडा पहारा आहे. यामध्ये पहिला स्तर सेंट्रलचे जवान, दुसरा राज्य दल व तिसऱ्या स्तरातील पहाऱ्याला स्थानिक पोलीस राहतील.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Counting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.