Maharashtra Election 2019 : शासकीय मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:13 AM2019-10-15T01:13:49+5:302019-10-15T01:14:29+5:30
रवि राणा हे युवा स्वाभिमान पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, पीरिपा, भाकप, माकप आघाडीचे बडनेरा मतदारसंघातील उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी मतदारांसोबत संवाद साधताना गत १० वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती सादर केली. कोंडेश्वर मार्गावर २८ एकर परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा मतदारसंघाच्या परिसीमेत ५० कोटी रुपयांच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर आहे. येत्या काळात ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांनी दिली. स्थानिक फ्रेजरपुरा येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
रवि राणा हे युवा स्वाभिमान पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, पीरिपा, भाकप, माकप आघाडीचे बडनेरा मतदारसंघातील उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी मतदारांसोबत संवाद साधताना गत १० वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती सादर केली. कोंडेश्वर मार्गावर २८ एकर परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारले जाणार आहे. येत्या काळात जिल्ह्यातील रुग्णांना नागपूर, मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही, असे ते म्हणाले. शासकीय जागेवर निवासस्थाने असलेल्या नागरिकांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पीआर कार्ड मिळवून दिल्याबाबत आनंद असल्याचे रवि राणा म्हणाले. ज्या कुटुंबीयांना पीआर कार्ड मिळाले, यापुढे त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अभिवचन त्यांनी दिले. विकासाचा हा रथ असाच पुढे कायम ठेवण्यासाठी पुन्हा सेवेची संधी द्यावी, असे आवाहन राणा यांनी केले.