Maharashtra Election 2019 ; मी जातीपातीचे राजकारण केले नाही : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:01:01+5:30

मतदारसंघातील तळेगाव मोहना, आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांच्या प्रचारार्थ राज्यातून ५० ते ६० दिव्यांग अचलपूर मतदारसंघात दाखल झाले असून आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीरसभेत या दिव्यांगांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. अचलपूर मतदारसंघाचे भविष्यातील व्हीजनही बच्चू कडू यांनी प्रचारसभांमधून मांडले.

Maharashtra Election 2019 ; I did not do caste politics: Bachchu Kadu | Maharashtra Election 2019 ; मी जातीपातीचे राजकारण केले नाही : बच्चू कडू

Maharashtra Election 2019 ; मी जातीपातीचे राजकारण केले नाही : बच्चू कडू

Next
ठळक मुद्देप्रचाराकरिता दिव्यांगही दाखल : गावागावांत प्रचार सभा

परतवाडा : मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या भरवशावर आज मी आपल्यापुढे उभा आहे. जातीपातीचे राजकारण मी केले नाही. आडनाव, चेहरा पाहून मी कामे केली नाहीत. सर्व गरजूंच्या मदतीला मी उभा राहिलो. सर्व जाती-पातीतील, धर्मातील लोकांची मी कामे केली आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच मला दिव्यांगांसह रुग्णसेवा करता आली, असा दावा अचलपूर विधानसभा क्षेत्रातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू यांनी केला.
मतदारसंघातील तळेगाव मोहना, आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांच्या प्रचारार्थ राज्यातून ५० ते ६० दिव्यांग अचलपूर मतदारसंघात दाखल झाले असून आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीरसभेत या दिव्यांगांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. अचलपूर मतदारसंघाचे भविष्यातील व्हीजनही बच्चू कडू यांनी प्रचारसभांमधून मांडले. या प्रचार सभांसोबतच अचलपूर, परतवाडा शहरात आपल्या संपर्क अभियानातून घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. शहरातील प्रत्येक वॉर्डातील मतदारांची त्यांनी थेट भेट घेतली. कधी स्कुटरवर, तर पायी चालत ते मतदारांपर्यंत पोहोचले.

आसेगावात प्रचारसभा
गुरूवार, १७ आॅक्टोबरला आसेगाव येथील बच्चू कडू यांच्या जाहीर प्रचारसभेत राजेश वाटाणे, प्रशांत नागापुरे, अजय तायडे, श्याम मसराम, अमोल लव्हाळे, अंकुश जवंजाळ, पुण्यावरून खास आलेले रफीकभाई, तर शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत रहेमानभाई, आबीद हुसेन, मंगेश देशमुख, जयंत गवई, रवि पाटील यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी प्रवीण पाटील, विजय थावाणी, मनोज नंदवंशी, बाळासाहेब खडसे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; I did not do caste politics: Bachchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.