Maharashtra election 2019 ; मतदारसंघात विकासकामांचा खासदारांनी केला जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:56+5:30
ग्रामीण मतदारांशी संवाद साधताना खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, बडनेरा मतदारसंघाचा गत १० वर्षांत झालेला विकास हा अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. अतिदुर्लक्षित भातकुली परिसरात झालेली विविध विकासकामे ही ग्रामीण जनतेला विश्वास देत आहेत. लोकसभेत पहिल्याच अधिवेशनात श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना मिळणाऱ्या तोकड्या ६०० रुपयांऐवजी १२०० रुपये अनुदान करण्यास केंद्र सरकारला भाग पाडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा मतदारसंघातील महाआघाडी, युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ भातकुली येथे बुधवारी जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी मतांचा जागर केला. मंचावर खासदार नवनीत राणा, रवि राणा व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामीण मतदारांशी संवाद साधताना खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, बडनेरा मतदारसंघाचा गत १० वर्षांत झालेला विकास हा अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. अतिदुर्लक्षित भातकुली परिसरात झालेली विविध विकासकामे ही ग्रामीण जनतेला विश्वास देत आहेत. लोकसभेत पहिल्याच अधिवेशनात श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना मिळणाऱ्या तोकड्या ६०० रुपयांऐवजी १२०० रुपये अनुदान करण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लोकसभेत अंध, विधवा, परितक्त्या, निराश्रित, निराधारांचे प्रश्न मांडले नाहीत. मात्र, ज्या गरीब, सामान्य मतदारांच्या भरवशावर मी लोकसभेत खासदार म्हणून गेले, त्यांच्या हक्काचे प्रश्न, समस्या मांडणे हे माझे कर्तव्य असून, ते मी प्रामाणिकपणे पूर्ण केले, असा ठाम विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला. भातकुली तालुक्यात पेढी प्रकल्पग्रस्तांना वाढीव अनुदान, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी पुढाकार, शेतीमालाला दीडपट हमीभाव आदी पायाभूत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही खासदार राणा यांनी दिली.
भातकु ली विकासाचे मॉडेल ठरले
भातकुलीत नव्याने पोलीस ठाणे, न्यायालय इमारत, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, क्रीडा संकुल, पठाण चौक ते ऋणमोचनपर्यंत १० कोटींतून विकास, रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण व चौपदरीकरण, जैन मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी ५० लाख रुपये, मुबलक पाणी सुविधा, ग्रामीण भागात रस्ते, पथदिव्यांची निर्मिती, व्यायामशाळा, समाजमंदिर, सांस्कृतिक भवन, वाचनालय आदी विकासकामे केल्याचा मनस्वी आनंद आहे. भातकुली विकासाचे मॉडेल ठरले आहे, असे रवि राणा म्हणाले.