Maharashtra Election 2019 : माझी लढाई अमरावतीच्या विकासासाठीच - सुनील देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:10 AM2019-10-15T01:10:53+5:302019-10-15T01:11:51+5:30
माझी लढाई ही अमरावतीच्या विकासासाठीच आहे. त्यात कधीही तडजोड मी करणार नाही, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांनी दिली. शहराच्या विविध भागांत रविवारी सुनील देशमुख यांनी रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरविकासाचे एकमेव ध्येय पुढे ठेवून आजवर काम करीत आलो. विकासकामात कुठलेही राजकारण न करता नि:पक्षपणे सर्वच भागाला विकासाच्या समान संधी देत कोट्यवधींची विकासकामे केलीत. माझी लढाई ही अमरावतीच्या विकासासाठीच आहे. त्यात कधीही तडजोड मी करणार नाही, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांनी दिली. शहराच्या विविध भागांत रविवारी सुनील देशमुख यांनी रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला.
रविवारी सायंकाळी ७ वाजता नवसारी प्रभागात देशमुख यांनी रॅलीद्वारे मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर किरणनगर, आदिवासी कॉलनी, आदर्शनगर, मैढ क्षत्रिय सुवर्णकार समाजाच्या दीपार्चन हॉल येथील उपक्रमांना भेटी दिल्या. सोमवारी सकाळी लक्ष्मीनगरातील संत लहरीबाबा मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली. ही प्रचार रॅली सरस्वतीनगर, शोभानगर, महेंद्र कॉलनी, नरेडीनगर, प्रवीणनगर आदी भागात गेली. या रॅलीदरम्यान सुनील देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या. परिसरातील विविध कामांचा लेखाजोखा यावेळी मांडण्यात आला. पदयात्रेला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.