Maharashtra Election 2019 ; रवि राणा यांच्या प्रयत्नातून ७८० कुटुंबीयांना पीआर कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:45+5:30
महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. हनुमान नगरवासीयांनी पी.आर.कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे रवि राणा यांनी कौतुक केले. बडनेरा मतदारसंघातही लवकरच पी.आर. कार्ड वितरित केले जातील, असा विश्वास रवि राणा यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रयत्नाने हनुमाननगर परिसरातील ७८० कुटुंबीयांना पी.आर. कार्डचे वाटप निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच करण्यात आले. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे हक्काच्या घरांचे स्वप्न साकार झाल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हनुमाननगर येथे युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाडीच्यावतीने नारीशक्ती सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती होती. यावेळी रवि राणा यांच्या हस्ते कांडलकर प्लॉट, सागरनगर, बाबा चौक, हैदरपुरा, मुजफ्फरपुरा, महाजनपुरा, गुलिस्तानगर, दत्तुवाडी, गांधी आश्रम, आमलेवाडी आदी भागांतील गरीब, सामान्य कुटुंबांतील महिला, पुरुषांना ७८० पी.आर.कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. हनुमान नगरवासीयांनी पी.आर.कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे रवि राणा यांनी कौतुक केले. बडनेरा मतदारसंघातही लवकरच पी.आर. कार्ड वितरित केले जातील, असा विश्वास रवि राणा यांनी व्यक्त केला.
दरम्यान, निराधार महिलांना कुटुंबांचे तात्पुरते पालन पोषण करण्यासाठी शासनातर्फे दिले जाणारे २० हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचे १७ विधवा महिलांना धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला विनोद जायलवाल, जितू दुधाने, माजी नगरसेवक रहेमत खान पत्रकार, नगरसेविका सुमती ढोके, विलास पवार, विनोद गुहे, नरेंद्र राऊत, गणेश गायकवाड, प्रवीण मोकळे, राजेश अंबाडकर, रवि पाटील, मधुकर गाडबैल, ज्योती सैरिसे, सुनीता सावरकर, नाना सावरकर, मनोजन पवार, महेश बलानसे, गजानन बलानसे, अनिल ढोले, सुनील धांडे, गीता धांडे, जयंतराव वानखडे आदी उपस्थित होते.