Maharashtra Election 2019 ; प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:54+5:30

जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परिसर दणाणून सोडताहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री १० पर्यंत कायम असतो.

Maharashtra Election 2019 ; Preaching is over | Maharashtra Election 2019 ; प्रचार शिगेला

Maharashtra Election 2019 ; प्रचार शिगेला

Next
ठळक मुद्देनिवडणूक रणसंग्राम : आठही मतदारसंघांत पकडला जोर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार १९ ऑक्टोबरला ५ वाजता संपणार आहे. १७ ऑक्टोबरपासून अवघे तीन दिवस प्रचारासाठी शिल्लक राहत असल्याने उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व समर्थकांनी अक्षरश: पायाला भिंगरी बांधली आहे. ‘कोण आला रे कोण?’ अशा घोषणांनी गल्लीबोळात रॅली निघत आहे. पदयात्रेत डोक्यावर टोपी, गळ्यात दुपट्टा आणि उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर पिंजून काढणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील इलेक्शन फिव्हर वाढविले आहे. त्यांच्या जोडीला दिग्गजांच्या होणाऱ्या सभांमुळे प्रचाराची रंगत आणखी वाढत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परिसर दणाणून सोडताहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री १० पर्यंत कायम असतो. मित्रमंडळी, पाहुणे यांना गाठून उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची काळजी घेतली जात आहे. युवक संवाद, महिला मेळावा, ज्येष्ठांचा मेळावा यांची मांदियाळी सुरू आहे. निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठी, कार्नर सभा आणि समाजाच्या बैठकींना प्राधान्य देण्यात येत आहे. १९ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. यामुळे राहिलेल्या कालावधीत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे. उमेदवार स्वत: नाही पोहोचला तरी घरातील व्यक्ती मतदारापर्यंत जावी, या पद्धतीने प्रचाराचे नियोजन केले जात आहे.
आठही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी अडीच ते तीन लाखांहून अधिक मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार, कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. अंतिम टप्प्यात प्रचाराचा फेरआढावा घेतला जात आहे. एकगठ्ठा मतदान असलेल्या ठिकाणी पुन:पुन्हा जाऊन संपर्कात राहण्याचा प्रयत्न होत आहे. उमेदवार व समर्थक रात्री २ पर्यंत जाग्रण करीत आहेत. प्रचाराची वेळ संपल्यावर रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होते. त्यात दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराचे नियोजन केले जाते. आहे. २१ ऑक्टोबरला मतदान, तर २४ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
सायंकाळची प्रचार रॅली, कार्नर बैठकींना पसंती
अलीकडे शेतीकामे जोरात सुरु असल्याने उमेदवार गावात पोहचले की, घरी मतदार मिळत नसल्याचे ग्रामीण भागातील वास्तव आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बहुतांश उमेदवारांनी प्रचारासाठी सायंकाळी पसंती दर्शविली आहे. प्रचार सभा, रॅली, कार्नर बैठकी अथवा रोड शो हे सायंकाळी आयोजन करण्यात येत आहेत.

गुप्त बैठकींना वेग
सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत उमेदवार प्रचार रॅली, कॉर्नर सभा, मतदारांच्या भेटी यात व्यस्त आहेत. मात्र, रात्री १० नंतर निवडक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत गुप्त बैठकांनासुद्धा वेग आला आहे. विजयाचे प्लॅनिंग, एकगठ्ठा मते कशी मिळतील, याचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. गावखेड्यात राजकीय दबदबा असलेल्या पुढाऱ्यांना या गुप्त बैठकीत महत्त्व दिले जात आहे. मतदान चार दिवसांवर आले असताना अशा खलबतांना वेग आल्याचे चित्र सर्व मतदारसंघांत आहे.

सोशल मीडियाची साथ
दिवसभरात केलेला दौरा, मिळालेला पाठिंबा, घेतलेल्या बैठकी, भाषण आणि जाहीरनामे यांची इत्थंभूत माहिती मतदारांना मिळावी, यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जात आहे. दुसºया दिवशीचे नियोजन सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंंत पोहचविले जात आहे. परिसरानुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. त्या-त्या परिसरात उमेदवारांच्या प्रचाराची माहिती दिली जात आहे. प्रचाराला कमी कालावधी मिळाल्याने सोशल मीडियाची मोठी साथ उमेदवारांना प्रचारासाठी लाभली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Preaching is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.