Maharashtra Election 2019 ; बडनेरा मतदारसंघात प्रीती बंड यांचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:57+5:30
प्रीती बंड यांनी ‘हाऊस टू हाऊस’ मतदारांची भेट घेत बडनेराच्या विकासाची भूूमिका मांडली. बडनेरा नवी वस्ती, राम मंदिर झिरी, समाधान नगर, गजानन नगर, हमालपुरा, सुभाष नगर, नेताजी चौक,झंझाडपुरा, मारवाडीपुरा, सिंधी कॅम्प, म्हाडा कॉलोनी, जनकनगर, वरूडा, शारदानगर, बडनेरा आठवडी बाजार येथे जनसवांद यात्रा पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : मतदारसंघातील मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी आपली उमेदवारी आहे. स्व. संजय बंड यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी साथ देण्याचे आवाहन महायुतीच्या उमेदवार प्रीती बंड यांनी केले. गुरुवारी सकाळी त्यांनी बडनेरा येथे प्रचार रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करीत मतदारांशी संवाद साधला.
यामध्ये प्रीती बंड यांनी ‘हाऊस टू हाऊस’ मतदारांची भेट घेत बडनेराच्या विकासाची भूूमिका मांडली. बडनेरा नवी वस्ती, राम मंदिर झिरी, समाधान नगर, गजानन नगर, हमालपुरा, सुभाष नगर, नेताजी चौक,झंझाडपुरा, मारवाडीपुरा, सिंधी कॅम्प, म्हाडा कॉलोनी, जनकनगर, वरूडा, शारदानगर, बडनेरा आठवडी बाजार येथे जनसवांद यात्रा पार पडली.
बडनेरा मतदारसंघात विकासकामे करण्याची संधी द्यावी, आपल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. पदयात्रेत भाजपाचे तुषार भारतीय, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर, दिनेश बूब, प्रकाश बनसोड, बंडू धामणे, ललित झंझाड, राहुल माटोडे, राजेंद्र तायडे, आशिष दरोकार, मिथून सोलंके, नाना नागमोते, मंगेश गाले, गजेंद्र भैसे, कल्पना भैसे, नीलेश साळवे, सुरेश इंगळे, मोहन जाखड, अन्नू शर्मा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
भातकुली येथे जनसंवाद
बडनेरा मतदारसंघातील भातकुली येथे प्रीती बंड यांनी गुरुवारी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. स्व. संजय बंड यांनी तालुक्यात खूप विकासकामे केलीत. त्यांचा आदर्श घेऊन स्वप्नपूर्ती करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी नागरिकांना दिली.