Maharashtra Election 2019 ; सुनील देशमुख यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:39+5:30
इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ११ वाजता नामांकन रॅलीची सुरुवात झाली. प्रत्येकाने खांद्यावर महायुतीचा दुपट्टा परिधान केला होता. ढोल-ताशांच्या गजराने इर्विन चौकातील परिसर दणाणला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत युतीचे अमरावती विधानसभेचे उमेदवार सुनील देशमुख यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत पुरुष, महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, महापौर संजय नरवणे, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहणकर आदींचा रॅलीत सहभाग होता.
इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ११ वाजता नामांकन रॅलीची सुरुवात झाली. प्रत्येकाने खांद्यावर महायुतीचा दुपट्टा परिधान केला होता. ढोल-ताशांच्या गजराने इर्विन चौकातील परिसर दणाणला होता. यावेळी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, किरण पातूरकर, माजी खासदार अनंतराव गुढे, तुषार भारतीय, मिलिंद चिमोटे, बाळासाहेब वानखडे, दिलीप इंगोले, सचिव अतुल इंगळे, प्रदीप दंदे, प्रकाश बनसोड, सुनील काळे, संध्या टिकले, बाळू भूयार, दिनेश बूब, अशोक डोंगरे, किरण महल्ले, सुरेखा लुंगारे, सुचिता बिरे, वंदना मडघे, प्रमिला जाधव, स्वाती जावरे, नीता राऊत, माधुरी ठाकरे, कुसुम साहू, सोनाली करेसिया, सोनाली नाईक, रीता पडोळे, राधा कुरील, जयश्री डहाके, नूतन भूजाडे, लविना हर्षे, स्वाती कुलकर्णी, संगीता बुरंगे, इंदू सावरकर, सुनंदा खरड, अनिता राज, पद्मजा कौंडिण्य, रेखा भुतडा उपस्थित होत्या.
सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
अमरावती : या नामांकन रॅलीमध्ये वंदना हरणे, विजय वानखडे, गोपाल धमार्ळे, संजय वानरे, धीरज हिवसे, विवेक कलोती, श्रीचंद तेजवानी, अजय गोंडाणे, अजय सारस्कर, प्रणित सोनी, शिरीष रासने, आशिष अतकरे, चेतन गावंडे, एम.टी. नाना देशमुख, सुरेश जैन, घनश्याम राठी, डॉ. लांडे, डॉ. खानंदे, डॉ. अनिल पाटील, संयोगिता देशमुख, नितीन देशमुख, कोमल बोथरा, वासू खेमचंदानी, नाजिर बिके, कलालभाई, दादू मन्सुरी, रफीक मौत, रफिक चिकूवाले, हुजेफा गोरावाला, हाजी निसार, अक्षय गहाणकर, इशाक ठेकेदार, जहीरबाबू, डॉ. नावेद पटेल, साहेबखाँ हारुण अली, नौशाद अली, डॉ. इरफान, डॉ. तन्वीर, डॉ. मतीन, जाकीर जमाल, सुधीर शहा, बबलूभाई, भामरे, डॉ. सतीश देशमुख, साबीर नांदगाववाले, डॉ. अश्विन देशमूख, डॉ. सोमेश्वर निर्मळ, जुगलकिशोर पटेरिया, डॉ. लक्ष्मी भोंड, ज्योती ढोके, नंदू हरणे, सचिन मेहरे, शफी पहिलवान, विनय नगरकर, चव्हाण, मुनीष देशमूख, रफीक पत्रकार, हमिद शद्दा, आरिफ हुसेन, शब्बीर पत्रकार, अन्सार अली, अनिक मास्टर, अकिलबाबू, महबूबभाई, शकिल पहिलवान, मुजिफभाई, रवि खांडेकर, अज्जूभाई, सुधीर बोपूलकर, भारत चिखलकर, गंगा खारकर, लता देशमुख, विवेक चुटके, अविनाश चुटके, संजय शिरभाते, गोपी पटेल, सारंग राऊत, प्रशांत देशपांडे यांच्यासह राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.