Maharashtra Election 2019 : आघाडीत नेते राहिलेत कुठे?- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 06:25 PM2019-10-11T18:25:03+5:302019-10-11T18:26:00+5:30
राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार, हे निश्चित आहे. विरोधक हतबल झाले आहेत.
अमरावती : राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार, हे निश्चित आहे. विरोधक हतबल झाले आहेत. आघाडीत नेतेच कुठे राहिलेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा अमरावती येथील दसरा मैदानावर शुक्रवारी पार पडली, यावेळी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत एका विचाराने भाजप-सेनेची युती झाली; तोच विचार विधानसभा निवडणुकीतील युतीचा दुवा आहे. युतीचे सरकार हे पैशांच्या नव्हे, तर हिंदुत्वाच्या बळावर येणार आहे. अमरावती जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. ‘गद्दारी होता कामा नये’ असा कानमंत्र देण्यास उद्धव ठाकरे विसरले नाहीत. बळीराजाच्या सुरक्षिततेसाठी युती सरकार अनेक योजना सुरू करणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी ते दीड तास उशिरा दाखल झाले.कार्यक्रमस्थळी ते दीड तास उशिरा दाखल झाले.