Maharashtra Election 2019 ; ‘वरी लिस्ट’ : २६३ केंद्रांवर दिल्लीवरून नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:50+5:30

निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी, यासाठी आयोग आग्रही आहे. याच अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या म्हणजेच २६२८ केंद्रांच्या १० टक्के अर्थात २६३ मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाद्वारे (वेब कास्टिंग) आयोगाची करडी नजर राहणार आहे.

Maharashtra Election 2019 ; 'Worry List': A look at 263 centers from Delhi | Maharashtra Election 2019 ; ‘वरी लिस्ट’ : २६३ केंद्रांवर दिल्लीवरून नजर

Maharashtra Election 2019 ; ‘वरी लिस्ट’ : २६३ केंद्रांवर दिल्लीवरून नजर

Next
ठळक मुद्देआरओ, सीईओ स्तरावरही थेट प्रक्षेपण : उमेदवारांनी सूचविलेल्या पोलिसांच्या ‘क्रिटिकल’ केंद्रांचा समावेश

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उमेदवारांच्या लेखी चिंताजनक यादी (वरी लिस्ट) मधील किंवा पोलिसांच्या दृष्टीने क्रिटिकल असणाऱ्या २६३ मतदान केंद्रांवर यंदा निवडणूक विभागाच्या कॅमेऱ्यांचा रोख राहणार आहे. या केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया थेट प्रक्षेपणाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी, सीईओ मुंबई व निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयातूनही पाहता येणार आहे. या ठिकाणावरून मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी, यासाठी आयोग आग्रही आहे. याच अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या म्हणजेच २६२८ केंद्रांच्या १० टक्के अर्थात २६३ मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाद्वारे (वेब कास्टिंग) आयोगाची करडी नजर राहणार आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सीईओ मुंबई व निवडणूक आयोगाच्या दिल्ली स्थित कार्यालयातून या ठिकाणी नियंत्रण ठेवले जाणार आहे.
आयोगाच्या सूचनेप्रमाणे, विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिंतेची वाटणाऱ्या मतदान केंद्रांची नावे ते निवडणूक निर्णय अधिकाºयांना देऊ शकतात तसेच पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील (क्रिटिकल) असणाऱ्या केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून, संबंधित कंपनीद्वारे मतदान केंद्रावर इंटरनेट सुविधा, कॅमेरा, मतदान केंद्राबाहेर कर्मचारी व नियंत्रण कक्षात एक कर्मचारी अशी यंत्रणा तयार केली जाणार आहे. वेब कास्टिंगच्या सेटिंगनुसार दर मिनिटाला स्क्रीनवरील मतदान केंदे्र बदलत राहतील. याशिवाय संबंधित विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाच्या तपासणी नाक्यावरदेखील वेब कास्टिंग केले जाणार आहे. अनेक ठिकाणी विजेचा अडसर आहे. मात्र, ज्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी कॅमेºयाद्वारे वेब कास्टिंग केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.

मतदारसंघनिहाय वेब कास्टिंग केंदे्र
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६२८ मतदान केंद्रे आहेत. यापैकी १० टक्के म्हणजेच २६३ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात ३७, बडनेरा ३३, तिवसा ३२, दर्यापूर ३४, मेळघाट ३५, अचलपूर ३० व मोर्शी मतदारसंघात ३१ केंद्रांचे या पद्धतीने थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

क्रिटिकल केंद्रांवर विशेष नजर
जिल्ह्यात ३७ केंदे्र पोलिसांच्या दृष्टीने क्रिटिकल आहेत. या ठिकाणी मतदारांकडे मतदार ओळखपत्रांचे प्रमाण कमी आहे तसेच एकल मतदारसंख्या जास्त आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार यापूर्वी राजकीय तणावाचे प्रकार येथे घडले आहेत. अशा ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त करण्यात आलेले आहेत. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व वेब कास्टिंग आदी साधनांद्वारे या ठिकाणी आयोगाची नजर राहणार आहे.

थेट प्रक्षेपणात आवाजही राहणार
माहितीनुसार, वेब कास्टिंग असणाºया मतदान केंद्रांमध्ये पेनसदृश तीन मेगापिक्सल कॅमेरा भिंतीला लावला जाणार आहे.या कॅमेºायद्वारे किमान २० फुटांपर्यंतचा आवाजही ऐकू येणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 'Worry List': A look at 263 centers from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.