Maharashtra Election 2019 ; तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांची जनसंवाद यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तिवसा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीरिपा, कम्युनिस्ट पक्ष आणि मित्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीरिपा, कम्युनिस्ट पक्ष आणि मित्र पक्ष महाआघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी तालुक्यातील चिखली, दिवाणखेड, कुºहा परिसरात नुकतीच जनसंवाद यात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला.
संपूर्ण ग्रामीण असलेल्या तिवसा विधानसभा मतदारसंघात आता प्रचार गतिमान झाला आहे. १० वर्षांत यशोमती ठाकूर यांनी आमदार म्हणून केलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने यशोमती यांनी आपण सत्तेत असलो-नसलो तरी सर्वसामान्य जनतेशी माझे नाते घट्ट असल्याचे सांगितले. यावेळी महिलांची व युवतींची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. माझे वडील स्व. भय्यासाहेब या मतदारसंघाला कुटुंब मानायचे; तोच वारसा मी आजवर जपला आहे, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली. मतदारसंघात मी खूप विकासकामे केली आहेत आणि यापुढेसुद्धा शेतकरी, महिला, बेरोजगार युवक, सिंचन सुविधा यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शेतक री, महिलांचे अधिकार आणि रोजगाराला प्राधान्य
येत्या विधानसभा निवडणुकीत केवळ आमदार म्हणून निवडणूक जिंकणे हा आपला उद्देश नाही आणि यापुढेही तो राहणार नाही. या मतदारसंघात मी खूप विकासकामे केली आहेत. परंतु, अजूनही बरीच विकासकामे व्हायची आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे, युवकांना रोजगार मिळावा आणि विशेषत: महिला बचत गटांना शासनाकडून रोजगार निर्मितीकरिता अर्थसाहाय्य मिळावे, या दृष्टीने माझा निर्णायक संघर्ष सुरू असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.