महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद; दोन्ही राज्यपालांची बैठक सुरू; कोश्यारींविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 02:16 PM2022-12-24T14:16:28+5:302022-12-24T14:17:05+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या उपस्थितीत सीमा भागातील जिल्ह्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे.
अमरावती - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कर्नाटक सीमावादावरुन सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. एकीकडे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा ऐरणीवर असताना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावरील जिल्ह्यांबाबत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी दोन्ही राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेण्यात येत आहे. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सुरू झाली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या उपस्थितीत सीमा भागातील जिल्ह्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर महाराष्ट्रातील भंडारा, नागपूर, अमरावती, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशातील बालाघाट, शिवनी, शिंदवाडा, बैतुल, बुरानपुर, खंडवा, हारगोन, बडवाणी आणि अलीराजपूर या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील नागपूर अमरावती बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातून थेट मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर नियमित वाहतूक होते. अमरावती जिल्ह्यातून बैतूल खंडोबा बऱ्हाणपूर शिंदवाडा या जिल्ह्याचा दळणवळण होत असते. त्यावरुन, वाद निर्माण न होण्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याचे राज्यपाल एकत्र बैठकीत सहभागी झाले आहेत. दरम्यान, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांना शिवसैनिकांनी विरोधक केला आहे.
अमरावतीत शिवसैनिकांचा विरोध
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अमरावतीत शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या राज्यपालांची सध्या सीमाप्रश्नावरुन बैठक सुरू आहे. त्या ठिकाणी शिवसैनिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी, पोलिसांनी त्यांना अडवल असता, शिवसैनिकांकडून बैठकीच्या दिशेने चपला दाखविण्यात आल्या.