महाराष्ट्र २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:10 PM2017-09-04T22:10:26+5:302017-09-04T22:10:57+5:30
यंदा राज्यात निसर्गाची अवकृपा झाली. यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी/वरूड : यंदा राज्यात निसर्गाची अवकृपा झाली. यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, युती शासनाने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे दुष्काळाच्या झळा शेतकºयांना बसलेल्या नाहीत. शेतकºयांच्या हितासाठी जलसंधारणाची कामे यापेक्षा जलद गतीने करून २०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंधारण, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोर्शी येथे केले.
मोर्शी पंचायत समितीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेल्या ना. मुंडे यांनी आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्याचा सन्मान करीत भूमिपूजन करणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी उपस्थित नागरिकांना त्यांनी जनसंवाद सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन कले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योग व खनिकर्म मंत्री प्रवीण पोटे, खासदार रामदास तडस, मोर्शीचे आमदार अनिल बोंडे, काटोलचे आमदार आशिष देशमुख. दिनेश सूर्यंवंशी, जयंत डेहनकर, वसुधा बोंडे, नगराध्यक्ष शीला रोडे, संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, अनिल डबरासे, शरद मोहोड, शंकर ऊईके, सुनील कडू भाऊराव छापाने, आप्पा गेडाम आदी उपस्थित होते. शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आपण सर्व माझ्या पाठीचा कणा आहात, तुम्हा सर्वांच्या सर्व प्रश्नांची सोडणूक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. मोर्शी, वरूड तालुक्यातील शेतकºयांसाठी शासनाने संत्रा प्रक्रिया उद्योग सरकारने हाती घेतला असून तो लवकरच सुरू होईल, असे खा.रामदास तडस यांनी सांगितले. प्रास्ताविक आमदार बोंडे यांनी केले.
देवेंद्र भूयार नजरकैदेत
जरूड : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या वरूड दौºयावर येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वाभिमानी पक्षाचे नेते व जि.प.सदस्य देवेंद्र भुयार यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस चौकी जरूड येथे स्थानबद्ध करून नजरकैदेत ठेवण्यात आले.
जिल्ह्यात सोलर प्रकल्प : पालकमंत्री पोटे
अमरावती जिल्ह्यात सोलर प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यातून विविध कामे केली जाणार आहेत. शेतकºयांना विजेच्या टंचाईचा सामना करावा लागतो. सोलर प्रकल्पामुळे तो कमी होईल असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोट पाटील यांनी केले. ते म्हणाले, महिलांना रोजगार प्राप्त व्हावे यासाठी महिलांना बचत गटांच्या माध्यामतून रोजगार मिळवून दिला जात आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेत वाढणाºया भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.