पाताळेश्वर मंदिरात साध्या पद्धतीने महाशिवरात्री महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:24 AM2021-03-13T04:24:03+5:302021-03-13T04:24:03+5:30
चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील प्रसिद्ध श्री पाताळेश्वर व श्री गुप्तेश्वर शिवमंदिरात ११ मार्च रोजी होणारे महाशिवरात्री ...
चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील प्रसिद्ध श्री पाताळेश्वर व श्री गुप्तेश्वर शिवमंदिरात ११ मार्च रोजी होणारे महाशिवरात्री यात्रा महोत्सव कोरोना प्रादुभार्वामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे मंदिरात अगदी साध्या पद्धतीने सदर महोत्सव साजरा करण्यात आला. यामुळे मंदिर परिसरात गुरुवारी पूर्णत: शुकशुकाट पाहावयास मिळाला.
मागील ४२ वर्षांपासून महाशिवरात्री महोत्सव व यात्रेची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोना संसर्गामुळे महाशिवरात्री महोत्सवात संस्थानमध्ये ह.भ.प. कैलास महाराज चांदूरकर यांनी भागवत कथा प्रवचन व ह.भ.प. प्रमोद महाराज काळे यांनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले. महाशिवरात्री पूजनाला अध्यक्ष नरेंद्र देशमुख, सचिव अशोक देशमुख, वामनराव खोडके, अमोल चोकडे, वॉटरमॅन राजू चर्जन, सरपंच विनोद गुल्हाने, विनोद बिजवे, प्रफुल्ल गुल्हाने आदींची उपस्थिती होती. महाप्रसाद, पालखी सोहळा मिरवणूक तसेच यात्रा संस्थानकडून रद्द करण्यात आली.