प्रभाकर वानखडे यांना महात्मा फुले समाजप्रबोधन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:16 AM2021-08-23T04:16:06+5:302021-08-23T04:16:06+5:30
अमरावती : येथील उपेक्षित समाज महासंघातर्फे यावर्षीचा राज्यस्तरीय महात्मा फुले समाज प्रबोधन पुरस्कार समाजसेवक, लेखक, साहित्यिक ॲड. प्रभाकर वानखडे ...
अमरावती : येथील उपेक्षित समाज महासंघातर्फे यावर्षीचा राज्यस्तरीय महात्मा फुले समाज प्रबोधन पुरस्कार समाजसेवक, लेखक, साहित्यिक ॲड. प्रभाकर वानखडे यांना आमदार रवी राणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड होते. प्रमुख अतिथी म्हणून जनाधिकार पार्टी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव चौधरी, वंदना वानखडे, क्रांतिज्योती ब्रिगेडचे प्रदेश समन्वयक ओमप्रकाश अंबाडकर, समाजसेविका रजिया सुलताना, काँग्रेस पार्टी व उपेक्षित समाज महासंघाच्या महानगराध्यक्ष देवयानी कुर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख, आय.ए.एस. अकादमीचे संचालक प्रा. नरेशचंद्र काठोळे, समता परिषदेचे प्रदेश सचिव तथा माजी उपमहापौर डॉ. गणेश खारकर, प्रदेश सदस्य बाबुराव बेलसरे, छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाचे महासंचालक डॉ. मंगेश देशमुख, कमलाकर घोंगडे उपस्थित होते. संचालन प्रा. उज्वला मेहरे व कवयत्री शीतल राऊत, तर आभार प्रदर्शन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्मिता घाटोळ यांनी केले.