महाविकास आघाडी आज आहे,उद्या मात्र सांगता येणार नाही; शरद पवार यांचे सूचक विधान

By गणेश वासनिक | Published: April 23, 2023 07:53 PM2023-04-23T19:53:55+5:302023-04-23T19:54:17+5:30

जेपीसी समितीत २१ जणांनी समिती असणार आहे. यात १५ सत्ताधारी तर सहा विरोधी पक्षाचे खासदार असतील. समितीचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे राहणार आहे.

Mahavikas Aghadi is today, but tomorrow cannot be said; | महाविकास आघाडी आज आहे,उद्या मात्र सांगता येणार नाही; शरद पवार यांचे सूचक विधान

महाविकास आघाडी आज आहे,उद्या मात्र सांगता येणार नाही; शरद पवार यांचे सूचक विधान

googlenewsNext

अमरावती : राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातील सांगता येणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुप्रिमो खासदार शरद पवार यांनी रविवारी येथे दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत महात्मा फुले अग्रीक्लचर फोरमच्यावतीने अमरावती येेथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान कोणाला फोडोफोडीचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे,आम्ही आमची भूमिका घ्यायची ती घेऊ,असे ते म्हणाले. राहूल गांधी यांनी उद्योजक गौतम अडाणी यांच्यावर कर्ज बुडविल्याप्रकरणी जेपीसी गठित करण्याच्या मागणीविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हणाले, जेपीसी हे सोल्युशन नाही.

जेपीसी समितीत २१ जणांनी समिती असणार आहे. यात १५ सत्ताधारी तर सहा विरोधी पक्षाचे खासदार असतील. समितीचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे राहणार आहे. त्यामुळे या समितीचा काय निर्णय येईल, हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणून जेपीसी नव्हे तर त्याऐवजी सर्वेाच्च न्यायालयाची समिती प्रभावी राहील, ही भूमिका मांडली. तरीही सहकारी पक्षांनी जेसीपीची मागणी केल्यास त्यांच्याबरोबरच असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, नितीन हिवसे, सधीर राऊत हे उपस्थित होते.

... म्हणून प्रकाश आंबेडकरांनी घेतली भेट

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर चर्चांना उधाण आले. मात्र यावर आता खुद्द शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहे. या जागांच्या अनुषंगाने आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाल्याचे शरद पवार यांनी दुजोरा दिला. परिणामी आता राज्यातही वंचित राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mahavikas Aghadi is today, but tomorrow cannot be said;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.