शेतकºयांच्या आंदोलनासमोर झुकले महावितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:04 PM2017-11-11T23:04:32+5:302017-11-11T23:04:49+5:30
खरीप पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीच्या अन्यायकारक फतव्यामुळे हजारो शेतकºयांचे नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : खरीप पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीच्या अन्यायकारक फतव्यामुळे हजारो शेतकºयांचे नुकसान होत आहे. याविरुद्ध शेतकºयांनी मोर्चा काढला. हा संताप पाहून अभियंत्यांना ३ तासांत १२ रोहित्रे सुरू करावी लागली.
मोर्शी तथा लेहगाव सबस्टेशन अंतर्गत येणारी रोहित्रे मागील १५ ते २० दिवसांपासून बंद आहेत. महावितरण अधिकाºयाना वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कपाशी, तूर व संत्रा, रबीचे चना, गहू या इतर पिकाचे नुकसान होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी महावितरण कंपनी जबाबदार असून नुकसानीचा पंचनामा शासनाने करावा व नुकसान भरपाई द्यावी व बंद रोहित्र तसेच कापलेले वीज कनेक्शन त्वरित जोडून देण्यात यावे, याकरीता महावितरण कार्यलयात शेतकºयांनी ‘कापूस घ्या वीज द्या’ असे आंदोलन केले. यावेळी देवेंद्र भुयार, अमर गोमंकाळे, नितीन साबळे, नितीन ढोमणे, सतीश ढोमणे, अतुल ठाकरे, पंकज शाहाने, गजानन ढाकुलकर, शरद गायकी, दिनेश टिपरे, नरेंद्र सोनगते, शरद जिचकार, युवराज निस्वाडे, वैभव फुके, शुभम तिडके, रवी मानकर आदी उपस्थित होते.