अमरावती जिल्हा परिषदेत ंकाँग्रेसचा 'महिला राज'

By Admin | Published: February 25, 2017 12:11 AM2017-02-25T00:11:45+5:302017-02-25T00:11:45+5:30

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी पार पडली.

'Mahila Raj' of Congress in Amaravati Zilla Parishad | अमरावती जिल्हा परिषदेत ंकाँग्रेसचा 'महिला राज'

अमरावती जिल्हा परिषदेत ंकाँग्रेसचा 'महिला राज'

googlenewsNext

आरक्षण : अनेक नवीन चेहऱ्यांना संधी, १५ महिला विजयी
अमरावती : जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी पार पडली. जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हा परिषदेत सर्वाधिक महिला सदस्य निवडून आणण्यात काँग्रेस पक्ष अव्वल ठरला आहे. या पक्षाच्या एकूण १५ महिला सदस्य निवडून आल्या आहेत.
५९ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक २६ सदस्य निवडून आले आहेत. विशेष म्हणजे मागील वेळी जिल्हा परिषदेत काँॅग्रेस पक्षाच्या दहा महिला सदस्य होत्या. यावेळी मात्र यात ५ महिला सदस्यांची वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ या निवडणुकीत भाजपाच्या चार महिला सदस्य निवडून आल्या आहेत. प्रहारच्या पाच नवनिर्वाचित सदस्यांमध्ये चार महिला सदस्य निवडून आल्या आहेत. याशिवाय बहूजन समाज पार्टी, युवा स्वाभिमान आणि लढा संघटना यांच्या प्रत्येकी एक या प्रमाणे महिला सदस्य निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ सदस्यांमध्ये पुरूषापेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. ३० महिला तर २९ पुरूष सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रतिनिधीत्व करणार आहेत.
एक महिला वगळता सर्वच नवीन चेहरे
जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी एकूण ३० महिलांना मतदारांनी कौल दिला आहे. तशाही आरक्षणामुळे ही संख्या अपेक्षित होतीच, यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील फुबगाव गटातून माजी सदस्या असलेल्या सुहासिनी ढेपे यावेळी बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. त्यामुळे या सभागृहात त्यांना पुन्हा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांचा हा अपवाद वगळता इतर २९ महिला सदस्या मात्र जिल्हा परिषदेच्या सभागृहात नवख्या आहेत. विशेष म्हणजे यामध्येही काही महिला सदस्यांचे यजमान यापूर्वी जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून राहीले आहेत. त्यामुळे ‘पतीराजां’च्या अनुभवाचा नवनिर्वाचित महिला सदस्यांना फायदा होणार आहे.

Web Title: 'Mahila Raj' of Congress in Amaravati Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.