निकालाच्या क्लिकसाठी ‘आई’ ठरली पासवर्ड!

By admin | Published: June 4, 2014 11:20 PM2014-06-04T23:20:09+5:302014-06-04T23:20:09+5:30

बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सुकता कोणाला असणार नाही? परंतु ऑनलाईन निकाल प्रक्रियेत एका ‘क्लिक’आड दडलेले यशापयश जाणून

'Mai' password for click on exit! | निकालाच्या क्लिकसाठी ‘आई’ ठरली पासवर्ड!

निकालाच्या क्लिकसाठी ‘आई’ ठरली पासवर्ड!

Next

शिक्षण मंडळाचा अनोखा प्रयोग : गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न
जितेंद्र दखने - अमरावती
बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सुकता कोणाला असणार नाही? परंतु ऑनलाईन निकाल प्रक्रियेत एका ‘क्लिक’आड दडलेले यशापयश जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आईच्या नावाचा ‘पासवर्ड’ वापरावा लागला. निकाल जाणून घेताना संगणकीकृत पद्धतीच्या वापरामुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने लढविलेली ही क्लृप्ती बर्‍याच अंशी यशस्वी ठरली. इतकेच नव्हे तर यामुळे यशप्राप्तीतही मुलांना आईचे विस्मरण झाले नाही आणि अपयशामुळे खचलेल्यांना आईच्या नावामुळे अप्रत्यक्ष बळही मिळाले.
नुकतेच बारावीचे ऑनलाईन निकाल जाहीर झाले. संगणकावर केंद्र क्रमांक आणि रोलनंबर टाकून कुणालाही कुणाचा निकाल आतापर्यंत पाहता येत होता. त्यामुळे या पद्धतीचा गैरवापर सर्रास होत असल्याचे शिक्षण मंडळाच्या लक्षात आले होते. ही पध्दत गैरसोईची आणि पुरेशी पारदर्शक नसल्याचे स्पष्ट झाल्याने या पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार शिक्षण मंडळाने केला.
त्यानुसार यंदाच्या वर्षापासून ‘ऑनलाईन’निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्याला ‘पासवर्ड’ म्हणून स्वत:च्या आईचे नाव टाकणे बंधनकारक करण्यात आले. आईचे नाव संगणकाने ग्राह्य धरल्यानंतरच विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास मिळाला. या नव्या उपक्रमामुळे निकाल बघताना होणार्‍या  गैरव्यवहारांना तर आळा बसलाच; पण  मुलांनाही आईच्या नावाचे महत्त्व कळणार आहे.  विद्यार्थ्यांच्या जीवनात बारावी परीक्षेचे असलेले महत्व लक्षात घेता यशाच्या पायरीवर चढताना विद्यार्थ्यांना आपल्या आईची कायम आठवण राहावी, ही कल्पकता शिक्षण मंडळाने यानिमित्ताने दाखविली आहे. २ जून रोजी शिक्षण मंडळातर्फे वेबसाईटवर निकाल पाहताना प्रत्येक विद्यार्थ्याला आईच्या नावाच्या पासवर्डचा वापर करून यशापयशापर्यंत पोहोचता आले. 
या पध्दतीचा वापर करण्यासाठी शिक्षण मंडळाने निकालासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये नव्या सॉफ्टवेअरचा वापर केला. शिक्षण मंडळाचा हा प्रयोग बर्‍याच अंशी यशस्वी ठरला.शिक्षण मंडळाने ‘आई’च्या नावाचा अशा कल्पक पध्दतीने वापर करून विद्यार्थ्याला आईची आठवण पासवर्डच्या रूपाने कंपल्सरी करून एक आदर्श प्रस्तुत केला.  
 

Web Title: 'Mai' password for click on exit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.