खून प्रकरणातील मुख्य आरोपीला २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:15 AM2021-02-16T04:15:47+5:302021-02-16T04:15:47+5:30
अमरावती: चुलत भावाचा चाकूने भोसकून व डोक्यावर खलबत्ता मारून खून करण्यात आल्याची घटना हमालपुरा येथे रविवारी सकाळी घडली होती. ...
अमरावती: चुलत भावाचा चाकूने भोसकून व डोक्यावर खलबत्ता मारून खून करण्यात आल्याची घटना हमालपुरा येथे रविवारी सकाळी घडली होती. या प्रकरणी तीन आरोपीला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता यातील मुख्य आरोपी सुनिल अजबेला २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली तर दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुनिल अजबे ( रा.हमालपुरा) याच्यावर २००९,२०१२,२०१६ या वर्षात कलम ३२४ व अन्य कलमान्वये राजापेठ ठाण्यात गुन्हा नोंद होता. परंतू गत चार वर्षात त्याच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद नसल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी सांगितले.
पहिली पत्नी असतानाही तिला सोडू दुसरी महिला घरात का आणली? या कारणावरून मृतक कैलास मोहन अजबे (३८ ल रा. चिचफैल) व आरोपी सुनिल माणिक अजबे(४५, रा. हमालपुरा) यांच्यात वाद झाला होता. यानंतर सुनिलने कैलासला तुला दहा वर्ष झाल्यानंतरही मुल का होत नाही याबाबीवर डिवचले होते. वाद विकोपाला गेल्यानंतर सुनिल, त्याची आई व पत्नीने संगनमत करून कैलासही हत्या केली. पुढील तपास पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखली वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे करीत आहेत.