मान्सूनचा मुख्य कालावधी संपुष्टात येणार !
By admin | Published: September 2, 2015 12:01 AM2015-09-02T00:01:09+5:302015-09-02T00:01:09+5:30
मान्सूनचा कालावधी संपुष्टात येणाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत पावसाची १२ टक्के तूट आहे.
आतापर्यंत १२ टक्के पावसाची तूट
५ सप्टेंबरपर्यंत
तुरळक ठिकाणी पाऊस
अमरावती : मान्सूनचा कालावधी संपुष्टात येणाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत पावसाची १२ टक्के तूट आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात ठळक हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे मध्यभारतसह विदर्भात ५ सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली.
पावसाळ्यात धुवांधार पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टीचे संकट ओढावल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुन्हा पावसाने दांडी मारली होती. पावसाची धुरा मान्सूनवर अंवलबून असते, मात्र, आता मान्सूनची धुरा हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. नैरुत्य मान्सून सध्या पूर्वोत्तर भारतात सक्रिय असून तेथे चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यांच्या प्रभावाने पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, सिक्कीम या भागात पावसाचा जोर राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञाचा आहे. या चक्राकार वाऱ्यापासून निघालेली कमी दाबाची द्रोणीय स्थिती बंगाल, आरिसा आणि उत्तर आंध्रप्रदेशवर असून याच भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.