अमरावतीकडे जाणाºया मुख्य मार्गाची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:21 PM2017-09-17T22:21:52+5:302017-09-17T22:22:13+5:30
अमरावतीकडे जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ता नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपुलापर्यंत छन्नी-छन्नी झाला आहे. पक्का रस्ता होईल तेव्हा होईल. कमीत कमी डागडुजी तरी करा, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावतीकडे जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ता नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपुलापर्यंत छन्नी-छन्नी झाला आहे. पक्का रस्ता होईल तेव्हा होईल. कमीत कमी डागडुजी तरी करा, अशा संतप्त प्रतिक्रिया येथून नियमित जाणाºया वाहन चालकांमध्ये आहे.
जुन्या वस्तीपासून ते नरखेड रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. दोन किलोमीटरच्या या खराब रस्त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. बडनेºयाहून नियमित नोकरी कामधंद्यासाठी जाणाºया वाहनचालकांना याचा केवळ मन:स्ताप होत नसून शारीरिक दुखापतीचाही त्रास झाल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित प्रशासनाने या खराब रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी. ज्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळेल.
बडनेºयातील या भागात पक्का रस्ता होणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून ऐकीवात आहे. मात्र जेव्हा पक्का रस्ता करायचा तेव्हा तो करा, आता मात्र चाळणी झालेल्या रस्त्याची डागडुजी तरी करा, असे संतप्तपणे बोलल्या जात आहे. चाळणी झालेल्या रस्त्याच्या कडेला बारीक गिट्टीचा थर साचला आहे. रात्रीच्या वेळेस अपुºया प्रकाश व्यवस्थेमुळे याठिकाणी वाहनचालक घसरून पडत आहे.
खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित प्रशासनाने याची तत्काळ दखल घेण्याची गरज आहे. अमरावती ते बडनेरा मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. खराब रस्ता चुकवित वाहन चालकांना आपला जीव मुठीत ठेवून हा रस्ता पार करावा लागतो आहे. प्रचंड दैनावस्था झालेल्या दोन किमीच्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीनेही लक्ष द्यावे, असेही वाहन चालकांसह बडनेरा वासीयांमध्ये बोलले जात आहे.
मणक्याच्या आजाराने वाहनचालक त्रस्त
नरखेड क्रॉसिंगजवळ पुलाच्या कामाला तब्बल पाच वर्ष लागले. त्या भागातला रस्ता देखिल खराब होता. तो त्रास कमी झाला असला तरी जुनीवस्ती ते नरखेड क्रॉसिंग उडाणपुलापर्यंतच्या खराब रस्त्यामुळे नियमित या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना मणक्याचे तसेच पाठीच्या दुखण्याचे आजार वाढत असल्याचे प्रकर्षाने बोलल्या जात आहे.