मजीप्राची वसुलीही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 12:10 AM2016-11-13T00:10:49+5:302016-11-13T00:10:49+5:30
पाचशे व हजारांच्या नोटा चलनासाठी मुदतवाढ मिळाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या ग्राहकांनी बिल देयके भरण्यासाठी गर्दी केली.
देयके भरण्यास गर्दी : दोन दिवसात ३० लाख जमा
अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा चलनासाठी मुदतवाढ मिळाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या ग्राहकांनी बिल देयके भरण्यासाठी गर्दी केली. गेल्या दोन दिवसात जीवन प्राधीकरणाकडे शेकडो ग्राहकांनी सुमारे ३० लाखांचे बिल देयकांची रक्कम जमा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडे शहरातील ८७ हजार ५७६ ग्राहक असून या सर्व ग्राहकांना दररोज ९० ते १०० दशलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या नळजोडणीधारकावर कोट्यवधीचे बिल देयके थकीत आहे. हे थकीत बिल भरण्यासाठी मजीप्राकडून अनेकदा ग्राहकांना सुचना देण्यात येते. मात्र, अनेक ग्राहक बिलाची रक्कम जमा करीत नाही. त्यामुळे ग्राहकांवर कोट्यवधीची थकबाकी आहे. मात्र, नुकताच शासनाने पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे मजीप्राची वसुली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या ग्राहकांजवळ पाचशे व हजारांच्या नोटा आहेत, असे ग्राहक तत्काळ पाण्याचे बिल भरण्याकरिता जात आहे. त्यातच पाचशे व हजारांच्या नोटाचे चलनास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे मजीप्राचे ग्राहक बिल देयके चुकविण्यासाठी गर्दी करीत आहे.
पाणी बिलाची रक्कम भरण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. यादरम्यान थकीत बिलांचा भरणा करण्यात येत असल्याने वसुली वाढली आहे. त्यातच मजीप्राचे कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली सुध्दा करीत आहे.
किशोर रघुवंशी, उपविभागीय अभीयंता, मजीप्रा.