मजीप्राने पाणीपुरवठ्यात सावधगिरी बाळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:17 AM2021-08-21T04:17:16+5:302021-08-21T04:17:16+5:30

अमरावती : सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाने नदी, नाल्यांना पूर येत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण व शहरी भागाला ...

Majipra should be careful in water supply | मजीप्राने पाणीपुरवठ्यात सावधगिरी बाळगावी

मजीप्राने पाणीपुरवठ्यात सावधगिरी बाळगावी

Next

अमरावती : सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाने नदी, नाल्यांना पूर येत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण व शहरी भागाला पाणीपुरवठा करताना मजीप्राने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. शहरातील अनेक भागात नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची तत्काळ दखल घेत आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी जीवन प्राधिकरणच्या मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

अमृत योजनेतून शहरात ५ लाख ते २५ लाख लिटर क्षमतेच्या १९ नवीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे आणि डेंग्यू, मलेरिया, अतिसार आदी आजारांपासून संरक्षणमिळावे, असे आ. राणा म्हणाले. सध्या शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. राजुरा येथील जलशुद्धीकरण केंद्राचीही स्वच्छता राखावी. नागरिकांना गढूळ किंवा अशुद्ध पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आमदार रवि राणा यांनी सांगितले.

चमननगर, रजानगर, अकोली, म्हाडा कॉलनी, नवसारी, रहाटगाव, महेंद्र कॉलनी, वलगाव रोड आदी ठिकाणी पाईपलाईन टाकून आवश्यक त्यांना तातडीने नळ कनेक्शनद्वारा घरपोच पाणी मिळण्यासाठी मजीप्राने तत्काळ कार्यवाही करावी, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.

या बैठकीला अजय जयस्वाल, सय्यद मोमीन, मंगेश सोळके, अमोल काळे, नितीन सोळके, पंकज अडसपुरे, मनीष गायकवाड, आफताब खान, जैनुद्दीन, धिरू अन्सार, ईकबाल मदारी, अनिल कुरेशी, सुधाकर खापर्डे, सुरेश कुकडे, विजय धोटे, संजय सोनवणे, विजय भाकरे, सतीश नेवारे, वासुदेव गावंडे, सचिन कडूकार, विशाल घोगडे, अशोक मोहरे, अशोक काऊलकर, बाबूलाल लेखरा, चंद्रकांत वाडेकर, संजय खनपट, लक्ष्मण नेवारे आदी उपस्थित होते.

Web Title: Majipra should be careful in water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.