मोबाईलचे केबल टाकताना मजीप्राची पाईपलाईन फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:01 PM2018-08-26T23:01:32+5:302018-08-26T23:01:49+5:30
पंचवटी चौकात एका कंपनीकडून ‘फोरजी’ केबल लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी आधीच असलेली जीवनप्राधिकरणची पाईपलाईन फोडण्यात आली. मुख्य चौकातच हा प्रकार घडला.
अमरावती: पंचवटी चौकात एका कंपनीकडून ‘फोरजी’ केबल लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी आधीच असलेली जीवनप्राधिकरणची पाईपलाईन फोडण्यात आली. मुख्य चौकातच हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांनी पाईपलाईन फुटल्याची बाब कंत्राटदाराच्या सुपवायझरच्या लक्षात आणून दिली. फुटलेली पाईपलाईन दुरूस्त करून देणार असल्याचे त्याने सांगितले. त्या ठिकाणी पुर्वीच जीवनप्राधिकरणाची व अन्य विभागाची केबललाईन टाकण्यात आली आहे. त्यावर आता मोबाईलची लाईन टाकण्याचे कामे सुरू आहे. तथापि या कामात नियोजन नसल्याने पाईपलाईनचे नुकसान झाले आहे. यासंबंधी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने तातडीने पाहणी करून नोटीस बजावयला हवी हवी ,अन्यथा पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. येथील मुख्य चौकात खोदकाम सुरू असल्याने व तातडीने ते पुर्ववत न करण्यात येत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
मजीप्राची परवानगी घेतली की कसे? याबाबत चौकशी करु. संबधित उपअभियंत्याला स्थळनिरीक्षण करुन तपासणीबाबत सूचना केली. अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- सुरेश चारथळ,
मुख्य अभियंता, मजीप्रा