रेल्वेचा मोठा अपघात, 20 डबे रुळावरुन घसरले, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 07:59 AM2022-10-24T07:59:01+5:302022-10-24T09:41:59+5:30

रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे 15 ते 20 डबे घसरले.

major railway accident in amravati, 20 coaches derailed, traffic stopped | रेल्वेचा मोठा अपघात, 20 डबे रुळावरुन घसरले, वाहतूक ठप्प

रेल्वेचा मोठा अपघात, 20 डबे रुळावरुन घसरले, वाहतूक ठप्प

googlenewsNext

अमरावती : अमरावतीमध्ये रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास 15-20 डब्बे रुळावरून घसरले आहे. सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे 15 ते 20 डबे घसरले. कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी इंजनसह रुळावरून घसरली. रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मोठा आवाज झाला. एकापाठोपाठ रेल्वेचे 15 ते 20 डबे रुळावरून खाली घसरले. मालगाडीचे इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे हे रुळावर आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.


दरम्यान, नागपूर, मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली आहे. तर काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी पोहोचले असून युद्धपातळीवर रेल्वे रुळावर आणण्याचे काम सुरू आहे.



 

Web Title: major railway accident in amravati, 20 coaches derailed, traffic stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.