वलगाव येथील माजी सरपंच हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:43 AM2019-01-18T01:43:13+5:302019-01-18T01:43:46+5:30

वलगाव ग्राम पंचायत सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्याप्रकारणाची उच्चस्तरिय चौकशी करावी, या मागणीकरिता आ.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Make a high level inquiry into the murder of former Sarpanch murderer in Vargaon | वलगाव येथील माजी सरपंच हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

वलगाव येथील माजी सरपंच हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

Next
ठळक मुद्देनिवेदन : यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : वलगाव ग्राम पंचायत सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्याप्रकारणाची उच्चस्तरिय चौकशी करावी, या मागणीकरिता आ.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
आष्टी गावाजवळील कामनापूर शिवारात १९ डिंसेबर २०१६ रोजी सरपंचाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सकाळी ८ वाजता शेत मजुरांना दिसुन आला.पोलिस घटनास्थळी पंचनामा करण्याकरिता आली.पोलिसांच्या चौकशीत सुध्दा तफावत आहे. पोलिस अद्याप आरोपी पर्यत पोहचली नाही.त्या खुनाचा तपास व आरोपीला पकडण्यासाठी गावकरी नागरिकांनी अनेकवेळा आंदोलनसुद्धा केली आहे. जाणूनबुजून चौकशी व तपास विलंब केल्यामुळे आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गावातील शिष्टमंडळांनी ना.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्या खुनाबाबत चर्चा केली. त्यांना सांगितले त्या खुनाचा तपास अधिकारी तपासाचे काम पुर्ण न होता त्या तपास करणारे अधिकऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहे. मुख्यमंत्री यांनी लेखी व तातडीचे त्या खुनाची चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले.त्या आदेशाची परत आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे देण्याचे ठरले. त्या वेळेस गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांची सुद्धा भेट घेवुन त्यांना सुध्दा निवेदन देण्यात आले. त्यावेळेस गावातील शिष्टमंडळामध्ये विठ्ठलराव मोहड, बबनराव खवड, सुधीर उगले, इमरान खान अब्दुल शारुख, अनिरूद्ध उगले, गजानन घोडे, रियाज अहमद, अहमद खान आदी उपस्थित होते.

Web Title: Make a high level inquiry into the murder of former Sarpanch murderer in Vargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.