पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करा
By admin | Published: October 4, 2016 12:16 AM2016-10-04T00:16:10+5:302016-10-04T00:16:10+5:30
राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. या घटनांचा अमरावती श्रमिक पत्रकार संघाद्वारा निषेध करण्यात आला...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अमरावती श्रमिक पत्रकार संघाची मागणी
अमरावती : राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. या घटनांचा अमरावती श्रमिक पत्रकार संघाद्वारा निषेध करण्यात आला व हे रोखण्यासाठी प्रभावी कायदा करावा अशी मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचे माध्यमातून शासनाकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यापूर्वीच्या व आताच्या सरकारकडून या कायद्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने पत्रकारांच्या भावनांची दखलघेऊन कायदा करावा अशीमागणी करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार विलास मराठे, संघटनेचे सरचिटणीस रविंद्र लाखोडे, उपाध्यक्ष मोहन अटाळकर, गोपाल हरणे, अनिल कुचे, गिरीष शेरेकर, कृष्णा लोखंडे, अमोल इंगोले, अनिल मुनोत, शैलेश धुंदी, प्रवीण कपिले, शशांक लावरे, महेश कथलकर, दिपा पाल, योगिनी अर्डक, शशांक नागरे, मिनाक्षी कोल्हे, गणेश वासनिक, गजानन मोहोड, जितेंद्र दखने, प्रदीप भाकरे, गौरव इंगळे, मयूर डांगे, नयन मोंढे, प्रफुल देशमुख, राजेश राजपूत, रहमतखान, वैभव चिंचाळकर, संदीप शेंडे, भैय्या आवारे, अतुल विडुळकर, संतोष ताकपीरे, जयराम आहुजा, श्रीरंग ढोके, अनिकेत ठाकरे, देवदत्त कुळकर्णी, शशीकांत तायडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)