ग्रामीण भागातील बँका आॅनलाईन करा

By admin | Published: June 12, 2017 12:13 AM2017-06-12T00:13:31+5:302017-06-12T00:13:31+5:30

शहरी बँकांप्रमाणे ग्रामीण भागातील बँका आॅनलाइन करून शेतकऱ्यांची परवड थांबविण्याची मागणी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

Make rural banks online | ग्रामीण भागातील बँका आॅनलाईन करा

ग्रामीण भागातील बँका आॅनलाईन करा

Next

वित्तमंत्र्यांना निवेदन : शेतकऱ्यांची परवड थांबविण्याची मागणी
परतवाडा : शहरी बँकांप्रमाणे ग्रामीण भागातील बँका आॅनलाइन करून शेतकऱ्यांची परवड थांबविण्याची मागणी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाच्या माध्यामातून करण्यात आली आहे.
शेतमाल विक्रीनंतर व्यापारी शेतकऱ्यांना धनादेश देतात. तो धनादेश ग्रामीण बँकांमध्ये दिल्यानंतर क्लियरन्ससाठी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. शेतकऱ्यांना बँकेच्या चकरा माराव्या लागतात. दुसरीकडे आर्थिक कोंडीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. या समस्या पाहता ‘डिजिटल इंडिया’ अंतर्गत बँकेच्या ग्राहकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी बँका आॅनलाइन करण्याची मागणी भाजपचे अचलपूर तालुकाध्यक्ष सुधीर रसे यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन त्यांनी ना.सुधीर मुनगंटीवार हे अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना दिले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी हे उपस्थित होते.

ग्राहकांनी मिळवली आॅनलाईन बँकिंगची माहिती
परतवाडा : देशात सर्वत्र कॅशलेस व्यवहाराला प्रारंभ झालेला आहे. त्याअनुषंगाने नजीकच्या परसापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर टेहरे, प्रमुख अतिथी पांडे मामा, पुरुषोत्तम घोरमाडे उपस्थित होते. संचालन विनोद भुसाटे यांनी केले. हा कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परसापूर शाखेच्यावतीने भारतीय रिझर्व बँक व नाबार्ड पुरस्कृत आर्थिक साक्षरता समुपदेशन सप्ताहांतर्गत घेण्यात आला.

Web Title: Make rural banks online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.