हिवताप, हत्तीरोग विभागात बरेचशे रक्तनमुने तपासणीविना पडून (सुधारित)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:49+5:302021-06-29T04:09:49+5:30
इंदल चव्हाण अमरावती : कोविड-१९ च्या आगमनापासून जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरवर कर्तव्य बजावावे लागत असल्याने त्यांचे मुख्य ...
इंदल चव्हाण
अमरावती : कोविड-१९ च्या आगमनापासून जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरवर कर्तव्य बजावावे लागत असल्याने त्यांचे मुख्य कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच हिवताप, हत्तीरोग विभागात दर महिन्याला रक्तनमुने तपासणीसाठी येतात. मात्र, प्रयोगशाळा वैज्ञानिक उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात अनुशेष वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्हा हिवताप कार्यालयात दर आठवड्याला १२०० ते १४०० अनुशेष राहत आहे. जून ते डिसेंबर हा हिवताप वाढीसाठी पोषक कालावधी असतो. जून महिन्यात किमान ८७०१ रक्तनमुने घेण्यात आले. मुळात कोविडमध्ये स्वॅब घेण्याची जबाबदारी सीएचओ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व आरोग्यसेविका यांना दिलेली आहे. परंतु पारेषण काळ सुरू होऊनसुद्धा त्यांची सेवा मूळ ठिकाणी वर्ग करण्यात आलेली नसल्याने रक्तनमुने तपासणीवर मोठा फरक जाणवत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मूळ कर्तव्याकडे पाठविणे गरजेचे झाले आहे.
बॉक्स
एकाच प्रयोगशाला वैज्ञानिकाकडे चार केंद्रांचा भार
हिवताप कार्यालयांतर्गत ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ४८ प्रयोगशाळा वैज्ञानिकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२ पदे भरलेली आहेत. यातील दोन कर्मचारी प्रसूती रजेवर, तर आसेगाव पूर्णा केंद्रावरील एक कर्मचारी ५-६ वर्षांपासून दीर्घ रजेवर आहे. काहींची सेवा अधिग्रहित केलेली आहे. सद्यस्थितीत कार्यरत सर्व कर्मचारी कोविड सेवेत व्यस्त आहेत. त्यामुळे एकाच कर्मचाऱ्याकडे तीन ते चार केंद्रांचा अतिरिक्त भार देण्यात आल्याची माहिती आहे.
--
डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची संभावना
सद्यस्थितीत आलेल्या रक्तनमुन्यांत डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्याने डास उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे पुढील महिन्यात डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याची संभावना व्यक्त होत आहे.
पॉइंटर
हत्तीरोग विभाग
जाने ते मे २०२१ एकूण घेतलेले रक्तनमुने - ३०१५७
तपासलेले रक्त नमुने - २४७६४
दूषित रक्तनमुने- १ सालनापूर (ता. धामणगाव रेल्वे)
एकूण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मंजूर पदे - ६
तपासणीसाठी कार्यरत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी- ३
कोविड रुग्णालयात सेवारत - ३
हिवताप विभाग
१ एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे - ५९
२ एकूण मंजूर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांची पदे - ४८
३ भरलेली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची संख्या-२२
४ तपासणीकरिता कार्यरत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संख्या-२२
५ कोविडमध्ये अद्यापही कार्यरत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची संख्या- सर्व
६ पारेषण काळात एकूण गोळा केलेल्या रक्त नमुन्याची संख्या-८७०१
७ आठ दिवसात तपासलेल्या हिवताप रक्तनमुन्यांची संख्या- ३६२५
7 आठवड्यातील अनुशेष तपासणी बाकी - ४३५
8 दूषित रक्तनमुने संख्या - १
बॉक्स
८० किलोमीटरपासून येतात काचा तपासणीला
अमरावती जिल्हा हिवताप कार्यालयात ८० किमीपासूनच्या पीएचसीमधून रक्तनमुने तपासणीला येतात. यामध्ये अंजनगाव ब्लॉक, अचलपूर ब्लॉकमधील पथ्रोट, यसुर्णा, धामणगाव गढी, शिराळा, कोकर्डा, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, शिरजगाव आदींचा समावेश आहे. मात्र, प्रयोगशाळा वैज्ञानिकांची ड्युटी कोविडमध्ये लावण्यात आल्याने मोजक्याच कर्मचाऱ्यांना ते तपासावे लागत आहे. परिणामी अनुशेष वाढत आहे.