माळेगाव धरणाला 'कोरड'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:57 AM2019-01-07T00:57:29+5:302019-01-07T00:58:56+5:30
तिवसा तालुक्याची तृष्णातृप्ती भागविणाऱ्या माळेगाव धरणाला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरड पडली आहे. हे धरण आटण्याची घटिका समीप आल्याने त्यातील जलजीवसृष्टीचा नाश झाला आहे. त्यामुळे नजीकच्या गावांवर येत्या उन्हाळ्यात जलसंकट निर्माण होण्याचे दुश्चिन्हे आहेत.
अमित कांडलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज(मोझरी) : तिवसा तालुक्याची तृष्णातृप्ती भागविणाऱ्या माळेगाव धरणाला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरड पडली आहे. हे धरण आटण्याची घटिका समीप आल्याने त्यातील जलजीवसृष्टीचा नाश झाला आहे. त्यामुळे नजीकच्या गावांवर येत्या उन्हाळ्यात जलसंकट निर्माण होण्याचे दुश्चिन्हे आहेत.
तिवसा तालुक्यातील माळेगाव धरण हे दरवर्षी पूर्णपणे भरते. त्यावर अनेक गावांचा पाणीपुरवठा निर्भर आहे. परिसरातील शेकडो एकर शेतीचे ओलित करण्याचा तो एकमेव जलस्रोत आहे. मात्र, यंदा अपुºया पावसामुळे हे धरण भरलेच नाही. परिणामी उन्हाळा सुरू होण्याआधीच हा प्रमुख जलस्त्रोत पूर्णपणे रिकामा झाला आहे. त्यामुळे गुरुदेवनगर, मोझरी परिसरातील विहिरींतील पाणी पातळी घटणार आहे. त्याचे दुष्पपरिणाम आतापासूनच दिसण्यास सुरवात झाली आहे. परिसरातील अनेक ग्रामपंचायतींना पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेण्याजोगी आहे. आगामी दिवसांत त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. या धरणाच्या पाण्यावर ओलित करून मोठ्यप्रमाणात उत्पादन घेतले जाते. सोबतच मोझरी गाव परिसरातील अनेक उद्योग धंद्यातही या धरणाच्या पाण्याचा दरवर्षी मुबलक उपयोग होतो. या धरणाच्या पाण्यामुळे नजिकच्या कित्येक किलोमीटर परिसरातील भूगभार्तील पाणी पातळी उंचावते. पर्यायाने गुरुकुंज मोझरी परिसरातील विहिरींतील पाण्याची पातळी कायम राहण्यास मोठी मदत होते. पण यंदा धरणातच पाणी नसल्याने य्अनेक घटकांवर परिणाम होणार आहे.
पंधरा वर्षांत माळेगाव धरण कधीच पूर्णपणे कोरडे झालेले नाही, हे विशेष. परंतु, यंदा जानेवारीतच ही स्थिती ओढवल्याने भीषण दुष्काळ राहणार असल्याचे चित्र धरणाच्या एकूण परिस्थितीवरून दिसून येते. पाण्याची मुबलकता असताना या धरणात मत्स्यपालन करून मासेमारी केली जात असे. पण दुसरीकडे धरण आटल्यामुळे त्यातील सुपीक माती जेसीबीच्या माध्यमातून उत्खनन करून ट्रॅक्टरच्या साह्याने पळविली जात आहे.