विवाहितेला पळविले, वारंवार बलात्कार; लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी

By प्रदीप भाकरे | Published: January 27, 2023 03:05 PM2023-01-27T15:05:42+5:302023-01-27T15:07:20+5:30

खल्लार पोलिसांत गुन्हा दाखल

man abducted married woman; Repeated rape, suicide threats if not married | विवाहितेला पळविले, वारंवार बलात्कार; लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी

विवाहितेला पळविले, वारंवार बलात्कार; लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी

googlenewsNext

अमरावती : एका ३० वर्षीय विवाहितेला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. २१ ते २६ जानेवारी या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास आरोपी गोपाल अरुण बाहे (३७, रा. कसबेगव्हाण, दर्यापूर) याच्याविरुद्ध बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोप गोपालने २१ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास ३० वर्षीय विवाहितेला लग्नाच्या उद्देशाने दुचाकीवर बसवून पळवून नेले. तिला थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. लग्न न केल्यास स्वत: जीव देतो, अशी धमकी दिली. खल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका स्थळावर आरोपीने तिच्याशी वारंवार जबरदस्ती केली.

तब्बल सहा दिवस तिच्याशी शारीरिक कुकर्म केल्यानंतर २६ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तिने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. स्वत:ला सावरत तिने पोलिस ठाणे गाठले. महिला पोलिस अधिकाऱ्याने तिची आपबिती ऐकून तक्रार नोंदवून घेतली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस पथक पाठविण्यात आले आहे.

Web Title: man abducted married woman; Repeated rape, suicide threats if not married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.