चल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू म्हणत विवाहितेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 03:04 PM2021-11-11T15:04:47+5:302021-11-11T15:10:14+5:30

दिवाळीची पूजा कशी करतात, अशी विचारणा करून विवाहितेशी सलगी करून आरोपीने तिचा विनयभंग केला. पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. असे म्हणत त्याने आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, असेही म्हणाल्याचे पीडितेने सांगितले.

man arrested for molesting woman in amravati | चल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू म्हणत विवाहितेचा विनयभंग

चल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू म्हणत विवाहितेचा विनयभंग

Next
ठळक मुद्देशासकीय नोकरदार असलेल्या तरुणाविरूद्ध गुन्हा

अमरावती : दिवाळीत देवीची पूजा कशी करतात, अशी विचारणा करून ते सांगण्यासाठी घराबाहेर आलेल्या एका विवाहितेशी सलगी करून त्याने तिचा विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी जिवाचा आकांत करताना त्याने तिला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची ऑफर दिली. एसआरपीएफ क्वार्टर वसाहतीत ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ च्या सुमारास ही घटना घडली. 

परमेश्वर सुखदेव इंगळे (३५) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता ही तिच्या पतीसह राहते. तर, आरोपी हा देखील अमरावतीतच नोकरी करतो. आरोपीची पत्नी ही दिवाळीकरीता माहेरी गेली आहे. दरम्यान, मंगळवारी पाच वाजताच्या सुमारास संबंधित विवाहिता ही तिच्या अंगणात आली. तेव्हा आरोपीने तिला आवाज दिला. दिवाळीची पूजा कशी करतात, हे तुमच्या पत्नीलाच विचारा, असे म्हणून ती घरामध्ये जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. असे म्हणत त्याने आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, असे तो म्हणाल्याचे पीडितेने सांगितले.

आरोपीचे डोळे बघून आपण प्रचंड घाबरलो. बराच प्रतिकार केल्यानंतर महिलेची सुटका झाली व घाबरलेल्या स्थितीतून बाहेर पडल्यानंतर तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी काका व लहान भावाला घेऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. आरोपीने अश्लिल बोलून देखील आपला विनयभंग केल्याचे पीडितेने म्हटले आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी त्या महिलेच्या तक्रारीवरून परमेश्वर इंगळे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीसीपी, एसीपींची घटनास्थळी भेट

प्रकरणाचे गांभीर्य पाहून प्रभारी पोलीस आयुक्त एम.एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील व ठाणेदार राहुल आठवले यांनी घटनास्थळी भेट दिली. तथा तक्रारकर्त्या महिलेकडून घटनाक्रम जाणून घेतला. पूनम पाटील यांनी त्या पीडितेला मानसिक आधार दिला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने भेट दिली. पीडितेकडून घटनाक्रम जाणून घेतला. आरोपीला तातडीने अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

पूनम पाटील, सहायक पोलीस आयुक्त

Web Title: man arrested for molesting woman in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.