दोघांसाठी रेल्वेचा डबा बुक केलाय, तू फक्त हो म्हण! मजूनची रोडरोमियोगिरी

By प्रदीप भाकरे | Published: March 30, 2023 04:29 PM2023-03-30T16:29:03+5:302023-03-30T16:29:49+5:30

अल्पवयीन मुलीने गाठले पोलिस स्टेशन, लोकांनी दिला चोप

man booked for molesting minor girl in amravati | दोघांसाठी रेल्वेचा डबा बुक केलाय, तू फक्त हो म्हण! मजूनची रोडरोमियोगिरी

दोघांसाठी रेल्वेचा डबा बुक केलाय, तू फक्त हो म्हण! मजूनची रोडरोमियोगिरी

googlenewsNext

अमरावती : आपल्या दोघांसाठी रेल्वेचा डबा बुक केलाय, तू फक्त हो म्हण, अशी गर्भित धमकी देत एका मुलीची छेड काढण्यात आली. रोडरोमियोच्या त्या भीतीदायक ‘प्रपोझल’ने ती प्रचंड घाबरली. मात्र, तेवढ्यात उपस्थितांना त्याला चांगलाच चोप दिला व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. २९ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास दर्यापूर येथील बसस्टॅन्डवर हा प्रकार घडला. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी त्या १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून दत्ता सिताराम कलाने (रा. माहुली जहांगीर, ह. मु. बसस्टॅंड, दर्यापूर) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्साेअन्वये गुन्हा दाखल केला.

दर्यापूर तालुक्यातील एका गावची रहिवासी असलेली मुलगी कॉम्प्युटर क्लाससाठी दर्यापूर शहरात ये- जा करते. २७ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास क्लास संपवून ती गावी जाण्यासाठी बसस्टॅंडवर आली असता, एक अनोळखी मुलगा तिच्याकडे आला. आपण रेल्वेने जाऊ, मी रिझर्व्हेशन केले आहे. दोघांसाठी रेल्वेचा डब्बा बुक केला आहे. आपण सोबत जाऊ, तुझा मोबाइल क्रमांक दे, असा तो बरळला.

अचानक घडलेल्या त्या घटनेने ती अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली. मात्र, थोड्याच वेळात सावरत तिने मदतीसाठी आरडाओरड केली. तेव्हा एक मुलगा मुलीची छेड काढत असल्याचे दिसून येताच उपस्थितांनी त्या अनोळखी तरुणाला चांगलाच चोप दिला. त्याला पकडून लोकांनीच दर्यापूर पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्याची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याने आपले नाव दत्ता कलाने असल्याचे सांगितले. त्यादरम्यान, मुलीचे पालकदेखील दर्यापूर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आपल्या भेदरलेल्या मुलीला धीर दिला.

घटनास्थळावरील उपस्थित लोकांनीच त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. त्याची ओळख पटवून त्या मुलीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली.

- संतोष टाले, ठाणेदार, दर्यापूर

Web Title: man booked for molesting minor girl in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.