पथक पाहताच ‘तो’ बोगस बियाणे टाकून पळाला, कृषी अधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 24, 2023 04:07 PM2023-06-24T16:07:43+5:302023-06-24T16:09:44+5:30

धामणगाव ठाण्यात गुन्हा दाखल

man ran away throwing bogus seeds by seeing police, agriculture officials complained to the police | पथक पाहताच ‘तो’ बोगस बियाणे टाकून पळाला, कृषी अधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार

पथक पाहताच ‘तो’ बोगस बियाणे टाकून पळाला, कृषी अधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार

googlenewsNext

अमरावती : प्रतिबंधित कपाशी बियाणे विक्रीसाठी परसोडा टी-पाइंटवर येत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. मात्र, पथक पाहताच हातातील बियाणांची पिशवी टाकून ‘तो‘ पळाला. पळताना त्याचा मोबाइलही हातातून पडला, याआधारे त्याची ओळखही पटली. प्रकरणी धामणगावच्या कृषी अधिकाऱ्यांनी दत्तापूर ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली.

कृषी अधिकारी पवनकुमार ढोमणे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एक इसम सारस अमृततुल्य परसोडी टी पाइंटवर प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांची विक्री करण्यास येत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी एसएओ व एडीओ यांना माहिती देऊन कृषी अधिकारी राजेंद्र बाविस्कर व कृषी सहायक रवी चव्हाण व पोलिस शिपाई संदीप वासनिक यांच्यासह दुचाकीने टी पाइंटवर पोहोचले.

रात्री ८:३० च्या दरम्यान पिशवी घेऊन तिथे पोहोचला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, पिशवी तिथेच टाकून तो पळाला. धावताना त्याच मोबाइलदेखील खाली पडला. तो पोलिसांनी ताब्यात घेतला. त्याच आधारे व बियाणे खरेदी करण्यासाठी आलेले शेतकरी यांच्या माहितीनुसार आरोपीची ओळख पटली आहे. सचिन तुकाराम पोपटकर (४८, रा. आजनगाव, ता. धामणगाव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी तक्रारीवरून भादंवि ४२०, बियाणे नियमाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: man ran away throwing bogus seeds by seeing police, agriculture officials complained to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.