तरूणीवर अत्याचार; इन्स्टावर ‘ते’ फोटो व्हायरल करत बदनामी

By प्रदीप भाकरे | Published: February 24, 2023 05:30 PM2023-02-24T17:30:31+5:302023-02-24T17:34:27+5:30

म्हणे लग्नही केले : नवी मुंबईच्या थोराड आरोपीचा प्रताप

man sexually abused young woman and circulate offensive photos on social media | तरूणीवर अत्याचार; इन्स्टावर ‘ते’ फोटो व्हायरल करत बदनामी

तरूणीवर अत्याचार; इन्स्टावर ‘ते’ फोटो व्हायरल करत बदनामी

googlenewsNext

अमरावती : दवाखान्यात काम करणाऱ्या एका तरूणीला प्रेमजाळ्यात ओढून तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने तिचे अंतरंगाचे फोटो इन्स्टावर व्हायरल करत तिची बदनामी केली. हा प्रकार उघड होताच तरूणीने २३ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपी हरिष मधुकर तायडे (४५, रा. नवी मुंबई) याच्याविरूद्ध बलात्कार व बदनामीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार पिडिता ही तिच्या वडिलांसह येथील एका दवाखान्यातच राहायला होती. फेब्रुवारी २०२२ च्या सुमारास आरोपीने फिर्यादी तरूणीसोबत तेथेच जवळीक साधली, बोलण्यास सुरुवात केली. १० फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपीने फिर्यादीस फोन करून भेटायला ये नाहीतर मी तुझे जिवाचे बरेवाईट करेन, अशी धमकी दिली. भीतीपोटी फिर्यादी ही आरोपीला भेटायला गेली असता त्याने तिच्यवर शारीरिक अत्याचार केला. वाच्यता करू नकोस असे देखील धमकावले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने तिला लॉजवर नेले. तेथे देखील तिचे सर्वस्व लुटले. माझ्यासोबत असलेले तुझे फोटो व्हायरल करतो. अशी धमकी तिला दिली.

इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट

आरोपी हरिश तायडे याने इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून पिडिताचे काही फोटो व्हायरल केले. काही मैत्रिणींच्या ती बाब लक्षात आली. त्यामुळे तिने त्याला जाब विचारला. मात्र त्याने उत्तर न देता, खजिल न होता आपण पिडिताशी लग्न केले आहे, असे खोटे मॅसेज व्हायरल केले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने तसेच त्या तरूणीच्या कुटुंबातील लोकांना तिला माझ्या घरी आणून द्या, मला तिचे सोबत लग्न करायचे आहे, असे बजावले. तसे न केल्यास आपण जिवाचे बरे वाईट करुन टाकेन अशी धमकी दिली.

Web Title: man sexually abused young woman and circulate offensive photos on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.