अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात आढळला मांडूळ प्रजातीचा साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:08 PM2018-10-10T13:08:26+5:302018-10-10T13:10:13+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटी किंमत असलेला मांडूळ साप सोमवारी दर्यापूर येथील भीमनगरात सर्पमित्रांना आढळला.

Mandal snake species found in Darayapur in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात आढळला मांडूळ प्रजातीचा साप

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात आढळला मांडूळ प्रजातीचा साप

googlenewsNext
ठळक मुद्देधनलाभासाठी उपयुक्त असल्याची मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटी किंमत असलेला मांडूळ साप सोमवारी दर्यापूर येथील भीमनगरात सर्पमित्रांना आढळला. हा दुतोंड्या साप ११९ सेंटीमीटर लांबीचा असून, त्याची गोलाई सहा सेंटीमीटर असल्याचे वनपाल डी.बी. सोळंके यांनी सांगितले.
दादू कृष्णराव गवई यांच्या घरी हा साप दिसला. सर्पमित्र राजू वानखडे यांनी तो साप पकडला. वनकर्मचारी आर.बी. पवार व सागर सोळुंके यांना कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळ गाठून साप ताब्यात घेतला. धनलाभासाठी या सापाचा उपयोग केला जातो. सोमवारी पितृमोक्ष अमावस्या असल्याने हा साप दर्यापुरात कसा आला, याचीही चर्चा नागरिकांमध्ये रंगत होती. विशेषत: हा साप लाल रंगाचा असून मातीमधील बिळात राहत असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी सट्टा बाजारातही मांडूळ प्रजातीचा साप आढळला होता. तस्करी करताना हा साप पोलिसांच्या मदतीने पकडून ताब्यात घेण्यात आला होता. त्यावेळी साप पकडणाऱ्याससुद्धा अटक करण्यात आली होती. सापाला मेळघाट जंगलात सोडणार असल्याचे वनपाल डी.बी. सोळंके यांनी सांगितले.

Web Title: Mandal snake species found in Darayapur in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.