चार्जशिटपूर्वीच मांडला अधिकाऱ्याने बदलीचा खेळ

By admin | Published: April 12, 2015 12:36 AM2015-04-12T00:36:39+5:302015-04-12T00:36:39+5:30

जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी पदावर शासनाने नियुक्ती केल्यानंतरही रुजू न झालेल्या वाय. एस. महांगडे यांचा चार्जशिट देण्याचा

Mandla's official transit game before charging | चार्जशिटपूर्वीच मांडला अधिकाऱ्याने बदलीचा खेळ

चार्जशिटपूर्वीच मांडला अधिकाऱ्याने बदलीचा खेळ

Next

अमरावती : जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी पदावर शासनाने नियुक्ती केल्यानंतरही रुजू न झालेल्या वाय. एस. महांगडे यांचा चार्जशिट देण्याचा सीईओंचा प्रस्ताव पूर्ण होण्यापूर्वीच महांगडे यांनी मंत्रालयास परस्परच बदली करून घेतली आहे. चार्जशिटऐवजी महांगडे यांची डहाणू पंचायत समितीत बीडीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती व पश्चिम विदर्भात न येणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा शासनाचा इरादा कुचकामी ठरला आहे.
जिल्ह्यात अद्यापही अधिकारी काम करण्यास अनुत्सुक आहेत. बदली आदेश लागू झाल्यानंतरही जे अधिकारी रुजू होणार नाहीत त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने दिली होती. ग्रामविकास विभागाने ९ एप्रिल रोजी तातडीने सुधारित आदेश काढत महांगडे यांच्या बदली आदेशात बदल करून त्यांना डहाणू पंचायत समितीत नियुक्ती देण्यात आली. (प्रतिनिधी)

शासनाने जिल्हा परिषदेत दोन अधिकाऱ्यांना बदलीवर पदस्थापना दिली होती. मात्र यापैकी सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता रूजू झाले. मात्र डेप्युटी सीईओ महांगडे हे रूजू झाले नव्हते. याबाबत शासनाने माहिती मागितली होती. परंतु शासन पातळीवर काय निर्णय झाला याबाबत माहिती नाही.
- अनिल भंडारी,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, अमरावती.

Web Title: Mandla's official transit game before charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.