जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या सभेत मंथन
By admin | Published: June 28, 2014 12:25 AM2014-06-28T00:25:14+5:302014-06-28T00:25:14+5:30
जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीची मासिक सभा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २५ जून रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात संपन्न झाली.
अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीची मासिक सभा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २५ जून रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेमध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
गेल्या १० वर्षात जेवढी महागाई वाढली नाही त्यापेक्षा जास्त महागाई एक महिन्यात वाढल्यामुळे मोदी सरकार हे जनतेच्या भावनांशी खेळत असून भाजप सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला, याची निंदा करण्यात आली.
केंद्र सरकारने गॅस सिलिंडरवरची सबसिडी, रॉकेलचे भाव, रेल्वे दरवाढ हे घातक निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशभर असंतोषाची लाट पसरल्याची भावना बबलू देशमुख यांनी व्यक्त केली. सभेमध्ये तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामपातळीवर पोहचून गावातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करावे. तसेच सर्व तालुकाध्यक्षांनी तालुका काँग्रेस कमिटीची मासिक सभा ही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी नियमित घ्यावी, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपस्थितांना सांगितले.
सभेचे प्रास्ताविक व संचालन भैयासाहेब मेटकर यांनी केले. सभेला श्रीराम नेहर, विद्याताई देडू, उषाताई उताणे, अ. रज्जाक ऊर्फ बाबाभाई, कैलास आवारे, बंडू देशमुख, रावसाहेब लंगोटे, सुरेश साबळे, संजय वानखडे, संजय मापले, हेमंत येवले, मनोज देशमुख, राजाभाऊ टवलारकर, प्रदीप देशमुख, भागवत खांडे, सुधाकर दहातोंडे, बापूराव गायकवाड, गजानन मेसरे, गणेश आरेकर, किशोर किटुकले, विनोद चौधरी, महेंद्रसिंग गहेरवाल, सुरेश आडे, मुकुंद देशमुख, संदीप रिठे, मुकद्दर खाँ पठाण, प्रशांत डहाणे, दिलीप मालपे, प्रकाश तरवले, सुनील पवार, सतीश धोंडे, विजय भोजने, अवधूत हरणे, बबलू बोबडे, समीर देशमुख, शिवानंद मदने, नंदकिशोर भोयर व काँग्रेसचे ग्रामीण व शहरचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)