'त्यांच्या'मुळे वाचला अनेकांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:27 PM2017-09-02T23:27:36+5:302017-09-02T23:28:09+5:30
पवित्र बकरी ईदला खुनी रंगात रंगविण्याचा प्रयत्न मोर्शी येथे झाला. क्रबस्थानच्या मशिदीवर बकरी ईदच्या नमाजनंतर आपसी वैमन्यासातून जीवघेणा गोळीबार करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : पवित्र बकरी ईदला खुनी रंगात रंगविण्याचा प्रयत्न मोर्शी येथे झाला. क्रबस्थानच्या मशिदीवर बकरी ईदच्या नमाजनंतर आपसी वैमन्यासातून जीवघेणा गोळीबार करण्यात आला होता. मात्र मारेकºयांचा हा प्रयत्न पोलिसांच्या प्रसंगावधनाने टळला, अन्यथा अनेकांचे मुडदे पडले असते.
मोर्शी येथे जुण्या वैमन्यस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्यात सैय्यद नूर सैय्यद मूसा, सैय्यद शकील सैय्यद भुरू, सैय्यद रेहान सैय्यद नूर, सैय्यद रियाज सैय्यद नूर या पिता-पुत्रांवर आबीद खान, हमीद खान, वसीमखान, कलीमखान, नाजीमखान, आरीफखान यांना अटक केली आहे. हे सर्व सहा आरोपी रिव्हॉलव्हर (देशीकट्टा). तलवारी, फरशा ही हत्यारे घेऊन आली होती. नमाज झाल्यानंतर बाहेर पडताना आरोपी आबीदखान याने सैय्यद नूर यांच्यावर गोळ्या झाडल्या, पहिला फ ायर वाया गेला, दुसरी गोळी त्यांच्या कंभरेला लागली तर तिसरी गोळी लागलीच नाही. गोळीचा आवाज होताच या ठिकाणी लोकांमध्ये दहशत निर्माण झाल्याने पळापळ सुरू झाली, तर सैय्यद नूर व त्यांच्या कुटुंबीयांचा खात्मा करण्यासाठी आरोपी सशस्त्र पाठलाग करू लागले. मात्र तेथे खुफिया विभागातील मोहन बारब्धे व वाहतूकचे अरुण साबळे बंदोबस्तात होते. त्यांना हा घटनाक्रम दिसताच त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना वायरलेसद्वारे माहिती दिली. नमाजापूर्वी बंदोबस्ताचा आढवा घेण्यास आलेल्या राजू बायस्कर यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस कर्मचाºयांनी रिवॉल्व्हर घेऊन असलेल्या आबीद खान याला शिताफीने अटक केली. तो गोळी चालविण्याच्या बेतात होता. याचवेळी त्याने पोलिसांच्या तावडीतून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान मोर्शी ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त लावला. आरोपींना घेऊन जात असताना मोठी गर्दी जमली होती.
व्यावसायिक स्पर्धेतून वाढले वैमनस्य
सैय्यद नूर व आरोपी आबीद खान या दोघांचा भंगाराचा व्यवसाय आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा व ग्राहकांना आकर्षित करण्याचा दोघांच्या प्रयत्नातून मोर्शीत खुनी हल्ला झाला. विशेष म्हणजे दोन्ही व्यावसायिक चोरीचा माल विकत घेतात, असा आरोप एकमेकांवर केला जात होता. त्यातून तीन महिन्यांपूर्वी सैय्यद नूर याने अलीम खान याच्यावर जीवघेणा हल्ला के ला होता. अलीम याच्यावर नागपुरात उपचार करण्यात आले, तर याप्रकरणी सैय्यद नूर याच्यावर गुन्हे दाखल करून त्याची कारागृहात रवाणगी करण्यात आली होती.