मेळघाटात अनेक शाळांकडून गुणवत्तेची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:15 PM2018-03-17T22:15:06+5:302018-03-17T22:15:06+5:30

कालपर्यंत केवळ खिचडी खाण्यासाठी खानावळी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करू लागल्याचे सत्य पुढे येऊ लागले आहे. शनिवारी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी प्रगत गुणवत्तेची गुढी उभारली.

Many schools in Melghat produce quality | मेळघाटात अनेक शाळांकडून गुणवत्तेची गुढी

मेळघाटात अनेक शाळांकडून गुणवत्तेची गुढी

Next
ठळक मुद्देप्रगत शाळा : आदिवासी विद्यार्थी वाचन लेखन करू लागले

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : कालपर्यंत केवळ खिचडी खाण्यासाठी खानावळी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करू लागल्याचे सत्य पुढे येऊ लागले आहे. शनिवारी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी प्रगत गुणवत्तेची गुढी उभारली.
प्रगत शिक्षण कार्यक्रमांतर्गत वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, अंकगणित आले पाहिजे, यासाठी भर दिला जात आहे. त्यात चिखलदरा तालुक्यातील ११ केंद्रांतील मोठ्या प्रमाणात शाळा विद्यार्थी घडवत असल्याचे आनंददायी चित्र पुढे आले आहे. गौलखेडा बाजार केंद्रात एकूण ११ शाळांचा समावेश आहे. पैकी मोझरी, वस्तापूर, कुलंगना बु., नागपूर आणि तेलखार या पाच शाळांनी गुणवत्तेची गुढीपाडवा या मराठी नववर्षानिमित्त गुढी उभारली.
केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना वाचन संख्येवरील क्रिया करता येतात. म्हणून आनंदोत्सव साजरा करून गुढी उभारण्यात आली.
जि.प. शाळेच्या केंद्रप्रमुख सविता भास्करे, शिक्षक लक्ष्मन केंद्रे, अशोक बडे, उज्ज्वला गाढे (मोझरी), नरेंद्र वर्मा, कविता कुबडे (नागापूर), सखाराम चिलाटी, अंकुश उत्तम राठोड, अंकुश राठोड, सोनाली दिवते, स्वाती कडू, सुरेश अलीने (वस्तापूर), राजीव खोजरे, सुनील श्रीराव, मीना धर्मढोक, सुनील साबडे (तेलखार), उज्ज्वला पारधी , अर्चना देशमुख (कुलंगणा बु.) आदींनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे बजावित आदिवाशी विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे शिक्षित करण्यासाठी परिश्रम घेतले.
चावडी वाचनाने बोलू लागले विद्यार्थी
प्रत्येक शनिवारी गावातील विद्यार्थ्यांना त्याच्या पालकापुढे वाचन करायला लावण्यात येत असल्याने आपल्या पाल्याची प्रगती त्यांना दिसू लागली आहे. परिणामी मेळघाटातील शाला आता विद्यार्थी घडवत असल्याचे आनंददायी चित्र दिसू लागले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदर प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. जि.प.चे शिक्षण सभापती जयंतराव देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रामभाऊ तुरणकर, जयश्री राऊत, वामन बोलके, रवींद्र आंबेकर, बुरघाटे या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिल्याने मेळघाट आता गुढी उभारल्याचे चित्र आहे.
तालुक्यात ४० शाळांनी उभारली गुढी
चिखलदरा तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंत १६८ जि.प. शाळा आहेत. पहिली ते पाचवीपर्यंत आठ हजार विद्यार्थी आहेत. शनिवारी ४० शाळांनी १०० टक्के प्रगतीची गुढी उभारली. २५ मार्चपर्यंत ८० शाळा त्यात सहभागी होतील.

Web Title: Many schools in Melghat produce quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.