चिखलदऱ्यात धो-धो पाऊस, भीमकुंडासह अनेक धबधबे कोसळू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:51+5:302021-07-23T04:09:51+5:30

(कॉमन फोटो) कॅशन : चिखलदरा पर्यटन स्थळाचे आकर्षण असलेल्या भीमकुंड चा धबधबा मुसळधार कोसळला) फोटो पी २२ भीमकुंड नरेंद्र ...

Many waterfalls including Bhimkunda started falling in the mud | चिखलदऱ्यात धो-धो पाऊस, भीमकुंडासह अनेक धबधबे कोसळू लागले

चिखलदऱ्यात धो-धो पाऊस, भीमकुंडासह अनेक धबधबे कोसळू लागले

Next

(कॉमन फोटो)

कॅशन : चिखलदरा पर्यटन स्थळाचे आकर्षण असलेल्या भीमकुंड चा धबधबा मुसळधार कोसळला)

फोटो पी २२ भीमकुंड

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : विदर्भाच्या नंदनवनात २४ तासात १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकूण आतापर्यंत ५५० मिलिमीटर पाऊस चिखलदऱ्यात कोसळला. काही तासातच मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळावरील महाभारतकालीन भीमकुंड धबधबा, जत्राडोह, जवाहरकुंड, चंद्रभागा सिपना आदी नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. दोन वर्षांनंतर २२ जुलैची पावसाची नोंद सर्वाधिक ठरली आहे.

अनेक दिवसांपासून लपंडाव सुरू असलेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री मुसळधार हजेरी लावली. ढगफुटीप्रमाणे धो-धो कोसळला. २४ तासात १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी चार तासातच सर्वाधिक पाऊस कोसळला. त्यामुळे चिखलदरा पर्यटन स्थळावर आतापर्यंत ५५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दोन दिवसाच्या पावसाने तालुक्यातील आदिवासींची घरे गळू लागली असून, पाळीव प्राण्यांची तारांबळ उडाली आहे.

बॉक्स

भीमकुंडसह धबधबे मनसोक्त कोसळू लागले

चिखलदरा पर्यटन स्थळा वरील महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये असलेला महाभारत कालीन भीमकुंडचा धबधबा मध्यरात्रीपासूनच धो-धो कोसळायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे सेमाडोह मार्गावरील जत्राडोह, सिपना नदी पात्रातील जवाहर कुंड धबधबा मनसोक्त ओसंडू लागले आहे.

बॉक्स

मुसळधार पावसात शेकडो पर्यटकांची हजेरी

चिखलदरा पर्यटन स्थळावर पावसाळी पर्यटक हजारोंच्या संख्येने दरवर्षी येतात. १२ जुलै रोजी १०२ मिलिमीटर व २२ जुलै रोजी १३२ मिलिमीटर पाऊस कोसळल्याने आतापर्यंत एकूण ५५० मिलिमीटर पाऊस झाला. चेरापुंजीची आठवण करून देणारा हा पाऊस ठरला. यामुळे हजारो पर्यटक चिखलदऱ्यात दाखल झाले आहेत.

220721\img-20210722-wa0097.jpg

चिखलदरा येथील महाभारत कालीन भीमकुंड चा धबधबा

Web Title: Many waterfalls including Bhimkunda started falling in the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.