मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:45 AM2023-10-31T11:45:54+5:302023-10-31T11:47:16+5:30

एसटी महामंडळाचा निर्णय

Maratha Reservation Protest ; 24 rounds of ST Buses going to Marathwada cancelled | मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द

मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द

अमरावती : मराठा समाजाला आरक्षण द्यावे,या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलन मराठवाड्यात चांगलेच तापले आहे. या पडसादही या भागात उमटू लागले आहेत. या आंदोनालमुळे बीड, नांदेड आदी जिल्ह्यात एसटी बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाययोजना म्हणून अमरावती विभागात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात फोडण्यात येणाऱ्या २४ फेऱ्या सोमवारपासून एसटी महामंडळाने स्थगित केलेल्या आहेत. या फेऱ्या केवळ वाशिम व विभागातील विविध जिल्हापर्यंतच प्रवासी वाहतूक करीत असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमरावती विभागात दररोज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात २४ फेऱ्या दररोज प्रवासी वाहतुकीसाठी ये-जा करीत असतात. यामध्ये अमरावती, पुणे, संभाजी नगर, जालना, नांदेड, पंढरपूर, लातूर, बीड, हिंगोली, परभणी आणि नांदेड आदी ठिकाणी दररोज सकाळ व संध्याकाळी प्रवासी वाहतुकीसाठी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकामधून सोडल्या जातात. या फेऱ्या दररोज सुमारे ६ हजार १७० किलाेमीटर धावतात. या बसेसच्या प्रवाशी वाहतुकीमुळे सुमारे ३० लाखांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळते. परंतु सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता सर्वत्र पसरू लागली आहे. या आंदोलनात राज्यात काही ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरावती विभागातून मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या २४ फेऱ्या मराठा आंदोलनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आहेत.

केवळ विभागातील सीमेपर्यतच वाहतूक

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातून दररोज पंढरपूर, लातूर,परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, संभाजीनगर, पुणे या ठिकाणी एसटी बसेसच्या फेऱ्या नियमित सोडल्या जातात. मात्र सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे वरील मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस केवळ वाशिम, खामगाव अमरावती विभागात सीमेपर्यंत एसटी बसेसद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र यापुढे एसटी बसेसच्या फेऱ्या स्थगित केल्या आहेत.

सध्या मराठवाड्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरावती विभागातील या फेऱ्या तूर्तास स्थगित केलेल्या आहेत.

नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

Web Title: Maratha Reservation Protest ; 24 rounds of ST Buses going to Marathwada cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.