पाचवी ते दहावीपर्यंत मराठी सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:44+5:302021-09-02T04:26:44+5:30

अमरावती : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पाचवी ते दहावीच्या वर्गासाठी मराठी विषय सक्तीचा करण्यात आल्याचे शुद्धिपत्रक शालेय शिक्षण विभागाने ...

Marathi compulsory from 5th to 10th | पाचवी ते दहावीपर्यंत मराठी सक्तीची

पाचवी ते दहावीपर्यंत मराठी सक्तीची

Next

अमरावती : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पाचवी ते दहावीच्या वर्गासाठी मराठी विषय सक्तीचा करण्यात आल्याचे शुद्धिपत्रक शालेय शिक्षण विभागाने सोमवार ३० ऑगस्ट रोजी जारी केले आहे.

राज्यातील सर्व परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतचा कायदा राज्य विधिमंडळात पारित केला आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश काढताना इयत्ता पाचवी ते दहावी या इयत्तासाठी मराठी भाषेला व्दितीय भाषेचा दर्जा देताना सक्ती या शब्दाचा वापर केला नव्हता. त्यामुळे मराठी भाषा शिकविण्यास उत्सुक नसलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससी भारतीय माध्यमिक शिक्षण परिषद (आरसीएमई) आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ आयबी केंब्रिज मंडळाच्या अनेक शाळांनी पळवाट शोधत मराठी भाषा विषय शिकविण्यास टाळाटाळ केली होती. याबाबत तक्रारी आल्याने शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शुद्धीपत्रक काढले. यात इयत्ता पाचवी ते नववी व दहावी आदी इयत्तांसाठी सर्व मंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी भाषा व्दितीय सक्तीचे असे वाचावे, असे म्हटले आहे.

Web Title: Marathi compulsory from 5th to 10th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.